सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 00:24 IST2017-06-10T00:24:39+5:302017-06-10T00:24:39+5:30
राज्यात सध्या शेतकरी तथा शेतकऱ्यांची स्थिती भयावह निर्माण झाली आहे.

सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्त करा
मुख्यमंत्र्यांना निवेदन: राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : राज्यात सध्या शेतकरी तथा शेतकऱ्यांची स्थिती भयावह निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त असून रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलने सुरू झाली आहेत. शासनाला जागे करण्याचे काम तमाम शेतकरी वर्ग करीत आहे. तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्ती तात्काळ करावी, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून जनतेला न्याय मिळवून द्यावे, राज्यात सर्वत्र शेतकरी रस्त्यावर उतरून शासनाचा निषेध व्यक्त करीत असून मोठे आंदोलन उभारले आहे. त्या आंदोलनाला तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठींबा असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. मागण्यांची पुर्तता करण्याची मागणी तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शिष्टमंडळात राकाँचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा राकाँ युवक अध्यक्ष अभिषेक कारेमोरे, महासचिव विजय डेकाटे, जिल्हा महिला अध्यक्ष कल्याणी भुरे, तुमसर विधानसभा अध्यक्ष विठ्ठलराव कहालकर, तुमसर शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे, तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, राजकुमार माटे, जिल्हा परीषद सभापती शुभांगी रहांगडाले, जिल्हा परीषद सदस्य गीता माटे, संगिता सोनवाने, रेखा ठाकरे, धनेंद्र तुरकर, प्रेरणा तुरकर, संगिता मुंगुसमारे, सुरेश रहांगडाले, अरविंद राऊत, राजेंद्र ढबाले, शिशुपाल गौपाले, गजानन लांजेवार, विष्णू पटले, रामचंद्र पारधी, पमा ठाकूर, सरपंच मदन भगत, रामकृष्ण हुकरे, नगरसेवक सलाम तुरकर, नगरसेविका खुशलता गजभिये, राम बिसने, आशिष रहांगडाले, मंगेश टेंभरे, संदीप पेठे, माणिक ठाकरे, मधु साखरवाडे, कादर अंसारी, उमेश कटरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.