गोसेखुर्द प्रकल्पाची रखडलेली कामे पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:34 IST2018-09-29T21:34:33+5:302018-09-29T21:34:50+5:30
जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेला गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. ही कामे लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार डॉ.परिणय फुके यांच्याकडे केली.

गोसेखुर्द प्रकल्पाची रखडलेली कामे पूर्ण करा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील महत्वपूर्ण असलेला गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम अनेक वर्षापासून रखडलेले आहेत. ही कामे लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार डॉ.परिणय फुके यांच्याकडे केली. त्यानुसार शनिवारला गोसेखुर्द संदर्भात नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली. डाव्या कालव्यामधून निघणारे उप कालवे त्वरीत दुरुस्त करण्याबाबत जमिनीचे हस्तांतरण करण्याबाबत थेट अनुदान शेतकºयांना देवून कामे पूर्ण करण्याबाबत अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यकारी संचालक सुर्वे यांनी गोसेखुर्दची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन डॉ.परिणय फुके यांना दिले. बैठकीमध्ये मुख्य अभियंता कांबळे, अधीक्षक अभियंता नार्वेकर, कार्यकारी अभियंता झोड, किशोर पंचभाई व शेतकरी उपस्थित होते.