जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेळेत पूर्ण करा

By Admin | Updated: July 2, 2016 00:29 IST2016-07-02T00:29:18+5:302016-07-02T00:29:18+5:30

शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारची कामे वेळेच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश पालक सचिव दीपक कपूर यांनी दिले.

Complete the activities of Jalakit Shivar campaign in time | जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेळेत पूर्ण करा

जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेळेत पूर्ण करा

दीपक कपूर यांचे निर्देश : पालक सचिवांनी घेतला विकासकामांचा आढावा
भंडारा : शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारची कामे वेळेच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश पालक सचिव दीपक कपूर यांनी दिले. त्याच प्रमाणे पिक कर्ज वाटप व कर्ज पर्नगठणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावेत, अशा सूचना संबंधितांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध विभागाची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस धीरजकुमार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कायर्कारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, उप वनसंरक्षक एन. आर. प्रविण, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, सुजाता गंधे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर उपस्थित होते.
या बैठकीत पालक सचिव यांनी शेतकऱ्यांना देण्यात आलेले पिक कर्ज व कर्जाचे पुर्नगठण, पिक पाणी परिस्थिती, बी-बियाणे व खत पुरवठा, जलयुक्त शिवार अभियान, पाणी टंचाई, २ कोटी वृक्ष लागवड, अन्न सुरक्षा कायदयाची अंमलबजावणी व धान भरडाईची सद्यस्थिती आदि विषयाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.
पिक कर्ज वाटपाचे शासनानी दिलेले उद्दिष्टय पूर्ण करण्यासोबतच उद्दिष्टापेक्षा जास्त वाटप करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कर्ज पुर्नगठणाबाबत राष्ट्रीयकृत बँकांनी गंभिरतेने काम करावे, असे ते म्हणाले. जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असून भंडारा जिल्हयात प्रस्तावित करण्यात आलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मागेल त्याला शेततळे योजनेत अधिक काम करण्याची गरज असल्याचे पालक सचिव म्हणाले.
जिल्ह्यात शिधापत्रिकेचे आधार सोबत लिंकचे काम ८७ टक्के झाले असून या विषयी पालक सचिवांनी समाधान व्यक्त केले. अन्न सुरक्षा कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. धान भरडाई बाबत आढावा त्यांनी घेतला. जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील एकूण ६५ मिलधारकांद्वारे भरडाई करण्यात येते. जिल्ह्यात २८ जून अखेर १० लाख ५४ हजार ९५८ क्विंटल एवढी धान खरेदी झाली असून खरेदी केलेल्या धानापैकी ७ लाख ११ हजार ८३८ क्विंटल धानाची जिल्हयातील विविध विकास कामांचा आढावा घेतांना पालक सचिव म्हणाले, ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यात यावे. या बैठकी अगोदर पालक सचिव दीपक कपूर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Complete the activities of Jalakit Shivar campaign in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.