साकोलीत नारायण राणे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST2021-08-26T04:37:54+5:302021-08-26T04:37:54+5:30

केसाकोली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना साकोली तालुका व वाहतूक सेना यांच्यातर्फे केंद्रीय मंत्री नारायण ...

Complaint lodged against Narayan Rane in Sakoli | साकोलीत नारायण राणे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

साकोलीत नारायण राणे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

केसाकोली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना साकोली तालुका व वाहतूक सेना यांच्यातर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. तक्रारीप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आलेली आहे. ही तक्रार साकोली पोलीस ठाणे येथे देण्यात आलेली आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख किशोर चन्ने, वाहतूक सेनेचे अध्यक्ष मेश्राम, कुवरलाल बडोले, जितेंद्र उईके, अनिल लोंढे, सुभाष मेश्राम, सुरेश भलावी, विकास मने, नीलेश तुपे, गणेश जीवतोडे, विजय राऊत, विजय मेश्राम, अमरीश निकुरे, मेश्राम इंदल, वालदे व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Complaint lodged against Narayan Rane in Sakoli