प्रगत महाराष्ट्राची स्पर्धा स्वत:सोबत करावी

By Admin | Updated: October 10, 2016 00:32 IST2016-10-10T00:32:31+5:302016-10-10T00:32:31+5:30

प्राथमिक स्तरावरच्या शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम यशस्वी झाला आहे.

The competition of advanced Maharashtra is to be done with myself | प्रगत महाराष्ट्राची स्पर्धा स्वत:सोबत करावी

प्रगत महाराष्ट्राची स्पर्धा स्वत:सोबत करावी

अभय परिहार यांचे प्रतिपादन : माध्यमिक मुख्याध्यापकांची सहविचार सभा
भंडारा : प्राथमिक स्तरावरच्या शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम यशस्वी झाला आहे. ज्ञानरचनावाद व डिजिटल शाळांच्या माध्यमातून शिक्षणाच स्वरुप पालटले आहे. या सकारात्मक बदल लक्षात घेवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. स्वत:चा शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी स्वत:सोबतच स्पर्धा करावी, असे प्रतिपादन प्राचार्य अभय परिहार यांनी केले.
माध्यमिक स्तराच्या विद्यार्थ्यांनी गळती शून्यावर आणणे व विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण करावे, यासाठी माध्यमिक स्तरावर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी लालबहादूर शास्त्री शाळा भंडारा येथे माध्यमिक मुख्याध्यापकांची सहविचार सभा घेण्यात आली. सभेला उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार, हेंमत भोंगाडे, गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे, प्राचार्य माया देशमुख, नंदनवार यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील सहविचार सभा दोन सत्रात घेण्यात आली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर शासन निर्णयाचे २८ पानी शासन निर्णयाचे सुक्ष्म वाचन मुख्याध्यापकांकडून करुन घेण्यात आले.
सात जिल्ह्यातील २०१ मुख्याध्यापकांनी उपस्थिती दर्शविली होती. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर जिल्ह्यात यशस्वी करायच असेल तर माध्यमिक मुख्याध्यापक संघटना व विषय शिक्षक संघटना यांनी स्वत: पुढकार घेवून तालुका व जिल्हा स्तरावर कार्यशाळा, सहविचार सभा, परिसंवाद, प्रदर्शनी आदींचे आयोजन केले जावेत. प्रत्येक शाळा मदर स्कूल आहेत. त्या शाळा निश्चित करण्यात याव्यात. शंभर टक्के विद्यार्थी कोणत्याही शाळेत नववीत दाखल होतील. ही संकल्पना मदर स्कूलच्या माध्यमातून पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे. सीएसआरच्या सहकार्याने शाळा शैक्षणिक साधनाने परिपूर्ण करता येतील. गळती, निकाल आदी बाबत उत्कृष्ट असणाऱ्या पंधरा शाळांची निवड करण्यात आली. आता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामधून स्पर्धात्मक परिक्षांची तयारी केली जाणार आहे. राज्याला देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षकांनी मनापासून मेहनत करावी असेही डायटचे प्राचार्य अभय परिहार म्हणाले. यावेळी उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार, हेमंत भोंगाडे यांनीही मार्गदर्शन केले. आभार उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार यांनी मानले. (प्रतिनिधी)

शाळा प्रगत करण्यासाठी लोकसहभाग शाळांचे संस्थाचालक समाज तसेच मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मनापासून कार्य केले तर कार्यक्रमाचा हेतू साध्य करणे सोपे होणार आहे.
बी. एल. थोरात,
शिक्षणाधिकारी (माध्य.)
जिल्हा परिषद भंडारा

Web Title: The competition of advanced Maharashtra is to be done with myself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.