स्वीडन विद्यार्थ्यांशी साकोलीच्या विद्यार्थ्यांचा संवाद
By Admin | Updated: January 26, 2016 00:27 IST2016-01-26T00:27:07+5:302016-01-26T00:27:07+5:30
येथील जिल्हा परिषद हायस्कुल सेवास्कोलन स्कुल, स्टॉकहोम, स्वीडन या शाळेसोबत नुकतीच व्हीडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली.

स्वीडन विद्यार्थ्यांशी साकोलीच्या विद्यार्थ्यांचा संवाद
व्हिडिओ कॉन्फरन्स : माहितेचे आदान प्रदान, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी
साकोली : येथील जिल्हा परिषद हायस्कुल सेवास्कोलन स्कुल, स्टॉकहोम, स्वीडन या शाळेसोबत नुकतीच व्हीडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली. ९ वी च्या विद्यार्थ्यांसोबत सेवास्कोलन स्कुल, स्टॉकहोम, स्वीडन या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कुटुंब, शाळा, भाषा, अन्न, कपडे, परंपरा, जीवनमान, हवामान, शिक्षणाचे जीवनातील महत्व, संगीत संवादाचे विषय होते.
या विषयावर दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी एकमेकांना प्रश्नोत्तरे केलीत. दोन्हीकडील विद्यार्थ्यांनी आपापल्या भाषेतील राष्ट्रगीत सादर केलेत. या कॉन्फरन्स मध्ये जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भात, पोळी व भाजी हा दैनंदिन आहार ताटामध्ये दाखविला व सेवास्कोलन स्कुल, स्टॉकहोम, स्वीडनच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जेवणातील मीट बॉल दाखविला. या कॉन्फरन्समध्ये प्राची बडोले, तनुजा बावनकुळे, चेतना चनकापुरे, खुशी इटनकर, आसावरी डोंगरे, पूजा ठाकरे, मयूर करंजेकर, हर्ष भगत, सूरज कटनकर, वैभव धुवारे यांनी भाग घेतला. सदर व्हीडीओ कॉन्फरन्स एक तास चालली व या कॉन्फरन्समधून विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमातील विषय माहित करून घेतले. सेवास्कोलन स्कुल, स्टॉकहोम, स्वीडन शाळेतील शिक्षक तॉमस कॉमिन्स्की यांनी तर जिल्हा परिषद हायस्कुलचे मुख्याध्यापक रवी मेश्राम व अरुण पारधी यांनी संचालन केले. (तालुका प्रतिनिधी)