निलंबनाचे अधिकार आता समितीला

By Admin | Updated: October 30, 2014 22:47 IST2014-10-30T22:47:36+5:302014-10-30T22:47:36+5:30

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निलंबनाचा आढावा घेण्यासाठी २ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या अगर कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात

The committee has the right to suspend now | निलंबनाचे अधिकार आता समितीला

निलंबनाचे अधिकार आता समितीला

शासकीय अधिकारी : कर्मचाऱ्यांवर मेहेरनजर
भंडारा : शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निलंबनाचा आढावा घेण्यासाठी २ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या अगर कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर २ वर्षांत निकाल लागला नसेल तर संबंधितांचे निलंबन संपुष्टात आणून अकार्यकारी पदावर नियुक्ती देण्याची शिफारस करण्याचे अधिकार निलंबन समितीला शासनाने बहाल केले आहेत.
बेहिशेबी मालमत्ता, नैतिक अध:पतन, लाचलुचपत, खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार या व अशा गंभीर प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल होवून निलंबित झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या निलंबनाचा आढावा घेण्यासाठी समित्यांची स्थापना केली आहे.
या दोन्ही समित्यांमध्ये एकही मागासवर्गीय अधिकारी नसेल, तर पहिल्या समितीमध्ये सचिव दर्जाचा मागासवर्गीय अधिकारी आणि दुसऱ्या समितीमध्ये उपआयुक्त दर्जाचा मागासवर्गीय अधिकारी यांचा समावेश करावा, अशा सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The committee has the right to suspend now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.