दिलासा! काेराेना मृत्यूची संख्या ‘सिंगल डिजिट’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:36 IST2021-05-10T04:36:05+5:302021-05-10T04:36:05+5:30
भंडारा जिल्ह्यात काेराेना उद्रेकासाेबतच मृत्यूचे तांडव सुरु हाेते. आतापर्यंत ९७२ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यातील सर्वाधिक मृत्यू हे एप्रिल ...

दिलासा! काेराेना मृत्यूची संख्या ‘सिंगल डिजिट’वर
भंडारा जिल्ह्यात काेराेना उद्रेकासाेबतच मृत्यूचे तांडव सुरु हाेते. आतापर्यंत ९७२ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. त्यातील सर्वाधिक मृत्यू हे एप्रिल महिन्यातील आहेत. दरराेज २० ते २५ जणांचा काेराेनाने मृत्यू हाेत हाेता. भंडारा येथील काेविड स्मशानभूमीत दरराेज चिता धगधगत हाेत्या. अशा स्थितीत रविवारी दिलासा मिळाला. ९ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. ८ एप्रिल राेजी तिघांच्या मृत्यूची नाेंद घेण्यात आली हाेती. त्यानंतर काेराेना मृतांचा आकडा दरराेज वाढत हाेता. अशा स्थितीत रविवारी ९ जणांचा मृत्यू झाला. त्यात भंडारा दाेन, लाखनी तीन, साकाेली तीन आणि पवनी तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. माेहाडी, तुमसर आणि लाखांदूर तालुक्यातील रविवारी मृत्यू झाला नाही. सिंगल डिजिटमध्ये मृत्यूची नाेंद झाल्याने सर्वांना माेठा दिलासा मिळाला.
दरम्यान, रविवारी १०८६ व्यक्तींनी काेराेनावर मात केली. तर ४११ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात भंडारा ७९, माेहाडी १७, तुमसर ५९, पवनी ४३, लाखनी २८, साकाेली १५२ आणि लाखांदूर तालुक्यातील ३३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ९२२ जणांना काेराेनाची बाधा झाली हाेती. त्यापैकी ४८ हजार ८१० व्यक्ती काेराेनामुक्त झाल्या. ९७२ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याचा मृत्यू दर १.७४ टक्के आहे.