कटकवार विद्यालयात ‘रंग निसर्गाचे’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST2021-03-31T04:35:35+5:302021-03-31T04:35:35+5:30

यानंतर नैसर्गिकरीत्या रंग कसे तयार करावे याचे मार्गदर्शन त्यांनी पत्रकाद्वारा केले. नैसर्गिक कोरडे रंग बनवा स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वा ...

‘Color Nature’ activities at Cuttack School | कटकवार विद्यालयात ‘रंग निसर्गाचे’ उपक्रम

कटकवार विद्यालयात ‘रंग निसर्गाचे’ उपक्रम

यानंतर नैसर्गिकरीत्या रंग कसे तयार करावे याचे मार्गदर्शन त्यांनी पत्रकाद्वारा केले. नैसर्गिक कोरडे रंग बनवा स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वा बहेकार, द्वितीय क्रमांक संचिता करंजेकरला, तर तृतीय क्रमांक योगिनी रणदिवे हिला प्राप्त झाला. प्रोत्साहनपर क्रमांक सायली क्षीरसागर, ऐश्वर्या संग्रामे तसेच वैष्णवी बोरकर हिला प्राप्त झाला. नैसर्गिक ओले रंग बनवा स्पर्धेत पूर्वा बहेकार प्रथम क्रमांक, संचिता करंजेकर द्वितीय, तर योगिनी रणदिवे, निधी बनकर, ऐश्वर्या संग्रामे, नीरा रणदिवे यांना प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त झाला.

स्पर्धेकरिता पूर्वा बहेकार, रूपाली बोरकर, भाविक बावणे, चंदन राऊत, वैष्णवी बोरकर, पवन रामटेके, युवराज बोबडे, रोशन बागडे, गुणवंत जिभकाटे, आदित्य शहारे, संकल्प वैद्य, छोटू बहेकार यांनी सहकार्य केले. या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरी परिसर स्वच्छता करून लाकडे न जाळता केरकचरा होळीचे ज्वलन करण्याचे ठरविले. कार्यक्रमाला प्राचार्य व्ही. एम. देवगिरकर तसेच सर्व शिक्षकवृंद, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Web Title: ‘Color Nature’ activities at Cuttack School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.