जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांचे स्थानांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:38 IST2019-07-16T23:38:15+5:302019-07-16T23:38:38+5:30
जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्थानांतरण झाले असून त्यांच्या ठिकाणी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गीत्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांचे स्थानांतरण
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्थानांतरण झाले असून त्यांच्या ठिकाणी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गीत्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी एप्रिल २०१८ मध्ये भंडाराचे जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली होती. उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ख्याती होती. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते. लोकसभा निवडणुकीची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. आता त्यांच्या ठिकाणी २००९ च्या बॅचचे डॉ.नरेश गित्ते भंडाराचे जिल्हाधिकारी म्हणून रूजू होत आहेत. ते नाशिक जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.