पालिका कर्मचाºयांचे सामूहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:14 IST2017-08-10T00:13:32+5:302017-08-10T00:14:09+5:30

नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचाºयांनी राज्यातील अन्य पालिका संघटनांनी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले.

Collective leave agitation of municipal employees | पालिका कर्मचाºयांचे सामूहिक रजा आंदोलन

पालिका कर्मचाºयांचे सामूहिक रजा आंदोलन

ठळक मुद्देभंडारा, साकोली, मोहाडीत आंदोलन : मागण्यांची पूर्तता न झाल्यास १५ आॅगस्टनंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयातील कर्मचाºयांनी राज्यातील अन्य पालिका संघटनांनी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास १५ आॅगस्टनंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
भंडारा येथे मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या उपस्थितीत पालिका कर्मचाºयांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कर्मचाºयांनी निषेध व्यक्त केला. निवेदनानुसार, पालिका व नगरपंचायत कर्मचाºयांचे १०० टक्के वेतन शासनमार्फत देण्यात यावे, २४ वर्ष आश्वासित योजना लागू करण्यात यावे, राज्य शासकीय कर्मचाºयांसोबत सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, रोजंदारी - कंत्राटी कर्मचाºयांना स्थायी करण्यात यावे, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्यात यावे, अनुकंपाधारकांच्या नियुक्तीची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे, सफाई कामगारांना नि:शुल्क घरे बांधून देण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, सफाई कामगार आणि वर्ग चार मधील पात्र कर्मचाºयांना त्यांच्या पात्रतेनुसार वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात यावी, महिला कर्मचारी, अधिकारी यांना प्रसूती रजा नियमानुसार देण्यात यावी, राज्यातील ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचाºयांना सामावून घेऊन वेतनासाठी १०० टक्के अनुदान द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठविण्यात आले. यावेळी पालिकेचे २५० पेक्षा जास्त कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
मोहाडी : मोहाडी नगरपंचायतच्या कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन पुकारून नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे दिले. नगरपंचायत कार्यालय बंद असल्याने आल्यापावली नागरिकांना परतावे लागले. परिणामी कागदपत्रांसाठी नागरिकांची गैरसोय झाली. महानगरपालिका, नगर पालिका, नगरपंचायत कार्यालयाच्या कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे एकदिवसीय काम बंद आंदोलन तर १० ते १४ आॅगस्टपर्यंत काळ्या फिती लावून काम करणे व २१ आॅगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. काम बंद आंदोलनात केशव निमजे, हेमंत कोहाड, पांडूरंग पराते, ललीत उज्जैनवार, विठ्ठल कुंभारे, चंदन वासनिक, कलीराम मोगरे, सुनिल कलोेशे, मनोहर हेडाऊ, मारोती निखार, सोमा पारधी, मंगेश गभणे, यशवंत बावणे, श्याम दिपटे, प्रमोद बागडे यांनी सहभाग घेतला.
साकोली : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दे साकोली नगर पालिका कर्मचाºयांनी नगरपरिषदेसमोर कामबंद आंदोलनाला पुकारले.
साकोली नगरपरिषद नव्याने स्थापन झाली असून या नगर परिषदेमध्ये साकोली व सेंदूरवाफा या दोन्ही नगरपंचायतीचे समायोजन करण्यात आले आहे. मात्र आनंद रंगारी, केवळराम इटोले, संदीप कापगते, यशवंत पुस्तोडे, ग्यानीराम शहारे, कैलाश राऊत, प्रकाश गेडाम, पांडूरंग कापगते, सुनिल टिकेकर, डोमा निंबेकर, सचिन डोमळे, रामगोपाल सोनवाने, रामदास गायधने, फुलचंद काटाळे यांच्यासह ४३ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Web Title: Collective leave agitation of municipal employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.