तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात दस्ताऐवजांचा ढीग

By Admin | Updated: January 14, 2015 23:01 IST2015-01-14T23:01:58+5:302015-01-14T23:01:58+5:30

तुमसर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्या दालनासमोरच्या मार्गावर महत्वपूर्ण दस्तावेजाचा ढीग ठेवलेला आहेत. दस्ताऐवजाने एक खोली तुडूंब भरली आहे. एका खोलीत उपविभागीय

Collection of documents in the verandah of tehsil office | तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात दस्ताऐवजांचा ढीग

तहसील कार्यालयाच्या व्हरांड्यात दस्ताऐवजांचा ढीग

तुमसर : तुमसर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्या दालनासमोरच्या मार्गावर महत्वपूर्ण दस्तावेजाचा ढीग ठेवलेला आहेत. दस्ताऐवजाने एक खोली तुडूंब भरली आहे. एका खोलीत उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. येथे दस्ताऐवज ठेवण्याकरिता स्वतंत्र खोली नाही. त्यामुळे दस्ताऐवजांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तुमसर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अरविंद हिंगे व मडावी यांच्या कार्यालयासमोर मोकळी जागा आहे. या मार्गावर प्रसाधनगृह आहे. या रिकाम्या जागेत महत्वपूर्ण दस्ताऐवज ठेवले आहेत. यात नॉन क्रिमीलेअरचे गठ्ठे आहेत. त्यावर सन २०१२ असे वर्ष नमूद आहे. त्याखाली दस्ताऐवजांचा समावेश आहे. दस्ताऐवजांची खोली दस्ताऐवजाने भरली आहे. दुसऱ्या एका खोलीत उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय असल्यामुळे दस्ताऐवज ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली नाही. प्रसाधनगृहाकडे दररोज शेकडोे नागरिकांचे येजा सुरु असते. त्यामुळे हे दस्ताऐवज असुरक्षित आहेत. किमान तहसील प्रशासनाने हे दस्ताऐवज कापडात गुंडाळण्याची गरज होती. शासकीय कार्यालयात दस्ताऐवज सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांची आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय सुरु होऊन दीड वर्षे झाले. अजूनपर्यंत दस्ताऐवजाकरिता स्वतंत्र खोली नाही. प्रत्येक विभागात कागदांचा ढिग जमा झाला आहे.
यासंदर्भात तहसीलदार सचिन यादव यांना संपर्क केल्यावर त्यांनी एका बैठकीत असल्याचे सांगितले. कनिष्ठ लिपीक एन.एस. मानकर यांना विचारले असता दस्ताऐवजाने एक खोली तुडूंब भरल्याचे सांगितले. त्यामुळे हे दस्ताऐवज व्हरांड्यात ठेवले आहे. स्वतंत्र खोली उपलब्ध झाल्यावर हे दस्ताऐवज ठेवण्यात येतील, अशी माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Collection of documents in the verandah of tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.