संविधानाच्या रक्षणाकरिता बहुजनांनो एकत्र या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:58 IST2017-11-27T23:58:32+5:302017-11-27T23:58:58+5:30
बहुजनांच्या न्याय हक्काकरिता माझी लढाई सुरु झाली आहे. संविधानीक अधिकारावर गदा आणण्याचे कटकारस्थान सरकार करीत आहे.

संविधानाच्या रक्षणाकरिता बहुजनांनो एकत्र या
आॅनलाईन लोकमत
पालांदूर : बहुजनांच्या न्याय हक्काकरिता माझी लढाई सुरु झाली आहे. संविधानीक अधिकारावर गदा आणण्याचे कटकारस्थान सरकार करीत आहे. शाहु, फुले, आंबेडकरी जनतेला संविधान हक्कापासून दुर नेले जात आहे. या अन्यायाविरोधात मला लढण्याचे बळ तुमच्यातुन मिळत आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या रक्षणाकरिता आपण बहुजनांना एकत्र यायचे आहे. असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी बहुजानांना केले आहे.
पालांदूरात शहिदांच्या स्मरणार्थ श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. मचांवर जेष्ठ नेते दामाजी खंडाईत, सरपंच जितेंद्र कुरेकार, पालांदूर, केशव बडोले कवलेवाडा, जि.प. सदस्य वर्षा रामटेके, उपसभापती विजय कापसे, तु.रा. भुसारी, उपसरपंच होमराज कापसे, उपसरपंच स्वप्नील खंडाईत, तंमुस अध्यक्ष केवळराम कापसे, प्रगतशिल शेतकरी श्रावण सपाटे, ठाणेदार अंबादास सुणगार, माजी जि.प. सदस्य प्रतिभा सेलोकर, माजी सरपंच वैशाली खंडाईत आदी मान्यवर उपस्थित होते.
पालांदूर सामाजिक भावनेने झपाटलेले गाव असून शहिदांना श्रध्दांजली देण्याकरिता सामुहिकतेने पुढे येण्याचे धाडस मागील नऊ वर्षापासून करीत आहे हे भंडारा जिल्हावाशीयांकरिता सौभाग्य आहे. म्हणून आयोजक भरत खंडाईत व मित्र परिवाराचे कौतुक केले.
या ठिकाणी संविधान दिनानिमित्ताने जिल्हा परिषद शाळा खराशीचा विद्यार्थी चिमुकला निधीश बोंदे याने संविधानाचे वाचन करीत इतरानाही संविधानाचे शपथ दिली. राष्टÑसंत तुकडोजी व गाडगेबाबा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांना वर्षभर स्वच्छेने स्वच्छ ठेवणारी मिरा खोडकर या भगीणीचा साडी चोळी देवून खा. नाना पटोलेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शहिदांना पुष्पचक्र व पुष्पमाला वाहून श्रध्दांजली वाहण्यात आली. यश खंडाईत या विद्यार्थ्याने हरियाणा येथे राष्टÑीय खेळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबद त्याला सुवर्ण पदकाने सन्मानित केले. प्रास्ताविकात भरत खंडाईत यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांनी नवनिर्मित साईमंदिराचे साईचे पुजन केले. राष्टÑसंत तुकडोजी व गाडगेबाबांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कवलेवाडा अंतर्गत खासदार निधीतून सुशिक्षीत तरुणांकरिता उभारलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करीत तरुणांना यथोचित मार्गदर्शन करीत प्र्रयत्नवादी होण्याचे बळ पटोले यांनी दिले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद शाळा खराशीचे मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी केले. कार्यक्रमाकरिता संगित शिक्षक भाष्कर पिंपळे, नितीन रणदिवे, शामा बेंदवार, कृष्णाजी जांभुळकर, मोरेश्वर खंडाइत, ईश्वर तलमले, भोजराम तलमले, डॉ. बिरे, निलकंठ खंडाईत, केशव कुंभरे, रत्नाकर नागलवाडे, प्रमोद हटवार तथा पालांदूर, कवलेवाडा, मेंगापूर जनतेनी सर्व सहकार्य केले.
कार्यक्रमाला शेकडो नागरिक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.