कोरोना टाळण्यासाठी सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:01:04+5:30

कोरोनाचे वाढते प्रस्थ धोकादायक ठरत आहे. कालपर्यत शहरात असणारा कोरोना ग्रामीण भागात पोहोचलेला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे नितांत गरजेचे आहे. उलटपणा किंवा बेजबाबदारपणाने कोरोनाला हरवू शकत नाही, याची प्रचिती आजपर्यंत आलेली आहे. कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने नकळत त्याचा शिरकाव आपल्या शरीरातून आपण त्याच्या आधीन होऊन जातो.

Collaborate to avoid corona | कोरोना टाळण्यासाठी सहकार्य करा

कोरोना टाळण्यासाठी सहकार्य करा

Next
ठळक मुद्देनिर्जंतुकीकरणासाठी फवारणी। पालांदूरच्या सरपंचाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करीत विनाकारण गर्दी न करता, सोशल डिस्टंन्सिंग सांभाळून सहकार्य करा, असे आवाहन पालांदुरचे सरपंच पंकज रामटेके यांनी केले आहे.
कोरोनाचे वाढते प्रस्थ धोकादायक ठरत आहे. कालपर्यत शहरात असणारा कोरोना ग्रामीण भागात पोहोचलेला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे नितांत गरजेचे आहे. उलटपणा किंवा बेजबाबदारपणाने कोरोनाला हरवू शकत नाही, याची प्रचिती आजपर्यंत आलेली आहे. कोरोना विषाणू संसर्गजन्य असल्याने नकळत त्याचा शिरकाव आपल्या शरीरातून आपण त्याच्या आधीन होऊन जातो. प्राथमिक लक्षणावरून त्याची ओळख जरी पटत असली, तरी मात्र आपल्या शरीराचे आरोग्य बिघडण्यासाठी कोरोना धोकादायकच आहे. त्स्वत:चे आरोग्य स्वत: सांभाळा व इतरांना सहकार्य करा, असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून पालांदूर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंचानी केले आहे.
गर्दी न करण्याचे निर्देश
कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता नाहक भाजीपाला बाजारपेठेत, किराणा दुकानात व इतर खरेदी दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग वापरून कमी वेळात खरेदी आटपून गर्दी टाळावी, घराबाहेर अनावश्यक कामानिमित्ताने बाहेर पडू नका. मास्क वापरल्याशिवाय घराबाहेर पडू नका. नाहक गप्पागोष्टी करीत बैठकीच्या ठिकाणी बसू नका. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा, अशी सहकार्याची अपेक्षा प्रशासनाने केली आहे.
तालुका प्रशासनाची पालांदूरला भेट
लाखनीचे तहसीलदार मलिक विराणी, मंडळ अधिकारी राकेश पंधरे, पालांदूर तलाठी कारसाळे, ठाणेदार दिपक पाटील, तसेच स्थानिक प्रशासनाचे पदाधिकारी आदींनी पालांदूर येथील स्थानिक व्यवस्थापनाचे नियोजनाच्या अनुषंगाने आशा वर्कर यांना विहित सूचना देऊन लक्ष ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत.

निर्जंतुकीकरण फवारणी
पालांदूर येथील गर्दीच्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने सोडियम पोक्लोराईड या रसायनाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे. पंचायत समिती लाखनीमार्फत ग्रामपंचायतला पुरविण्यात आलेल्या रसायनाची फवारणी यंत्रातून मजुरांच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँक, प्रगती कॉलनी व पालांदूर येथील काही भागात गर्दीच्या ठिकाणी फवारणी करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत कवलेवाडाचे सरपंच केशव बडोले यांनीसुद्धा संकट लक्षात घेता त्यांनीही गावातील वर्दळीच्या ठिकाणी फवारणी केलेली आहे.

Web Title: Collaborate to avoid corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.