‘थंडी’ वाढली

By Admin | Updated: December 8, 2015 00:34 IST2015-12-08T00:34:38+5:302015-12-08T00:34:38+5:30

मागील ४८ तासात शहरातील तापमान ८ अंश सेल्सिअसने खाली घसरून १२ अंशापर्यंत घसरले आहे.

'Colds' grew | ‘थंडी’ वाढली

‘थंडी’ वाढली

पारा १२ अंशावर : ८ अंशाची घसरण
भंडारा : मागील ४८ तासात शहरातील तापमान ८ अंश सेल्सिअसने खाली घसरून १२ अंशापर्यंत घसरले आहे. त्यामुळे सोमवार हा आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस राहिला आहे. प्रथमच डिसेंबर महिन्यात तापमान खाली घसरले आहे.
विदर्भातील वातावरणात थंड वारे वाहू लागले असून, मध्यभारतातील तापमान घसरत आहे. त्यामुळे पुढील २४ तासात तापमान पुन्हा १ ते २ अंशांनी घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सध्या सर्वत्र कमाल तापमान ३० डिग्रीपेक्षा अधिक तर किमान तापमान १५ अंशापर्यंत आहे. उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. त्याचा परिणाम हळूहळू जिल्ह्यातही जाणवू लागला आहे. रविवारी मध्यप्रदेशातील रिवा व रायसेन शहरात किमान ७ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात अचानक घट झाली आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरात जिल्ह्यातील पारा १० अंशापेक्षा खाली घसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार ३० डिसेंबर २०१४ या दिवशी सर्वाधिक थंडी पडली होती. या दिवशी पारा हा ७ अंशाखाली घसरला होता. थंडीचा जोर वाढल्याने अनेकांनी कपाट ठेवलेले उबदार कपडे बाहेर काढले आहेत. तर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून त्यातून शरीराला उब देण्याचा प्रकार शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Colds' grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.