शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता होणार कडक ; जिल्ह्यात १४४ कलम लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 13:38 IST

शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी; विनापरवानगी लाउडस्पिकर नाही

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम १४४ अन्वये अधिकाराचा वापर करून विविध बाबींवर निर्बंध आदेश जारी केले आहेत.

लाउडस्पिकर बंदी कोणतीही व्यक्ती, संस्था पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्त्यावरून धावत असताना त्यावर ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी ६:०० वाजेपूर्वी आणि रात्री १०:०० वाजेनंतर करता येणार नाही. हे आदेश जिल्ह्यासाठी २५ नॉव्हेंबरपर्यंत अंमलात राहतील.

विश्रामगृह वापरावर निर्बंध निवडणूक कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसील कार्यालये, सर्व शासकीय कार्यालये व विश्रामगृहे याठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक, मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, सत्याग्रह करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्ये वाजविणे किंवा गाणी म्हणणे, इत्यादी कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे.

मालमत्तेचे विद्रूपीकरण नको शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्ता विद्रूप करण्यास निर्बंध लावण्यात आले असून, निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रूपता करण्यास, बॅनर, फ्लॅक्स लावण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे.

शस्त्रास्त्रे बंदी निवडणुकीच्या कालावधीत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी व महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्या २० सप्टेंबर २०१४च्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील छाननी समितीने वगळलेल्या शस्त्र परवानाधारकांव्यतिरिक्त इतर सर्व परवानाधारकांस परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास व शस्त्र बाळगण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :Code of conductआचारसंहिताMaharashtraमहाराष्ट्रbhandara-acभंडारा