Cloudy weather lost a Rice | ढगाळ वातावरणाचा धानाला फटका
ढगाळ वातावरणाचा धानाला फटका

ठळक मुद्देशेतकरी धास्तावला : काढणीला आलेला धान पावसात भिजण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऐन धान कापणी हंगामाच्या तोंडावर ढगाळ वातावरणाने धानावर किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यातच काही ठिकाणी बरसलेल्या परतीच्या पावसामुळे धान पीक जमिनदोस्त झाले आहे. परिणामी बळीराजासमोर पुन्हा अस्मानी संकट उभे ठाकले असून कृषी विभाग मात्र बिनधास्त दिसून येत आहे.
जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येते. सुरूवातीच्या काळाला धान्य बियाण्यांची लागवड करण्यात आली. मात्र पाऊस बरसला नसल्याने हातात आले पºहेही करपले. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. वेळप्रसंगी वरूणराजाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यात धानाची रोवणीही सुरू झाली. पावसाचा सातत्यपणा असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. सप्टेंबर महिन्यापर्यंत धानावर कुठलेही संकट दिसले नाही. मात्र सप्टेंबर महिन्याच्या चवथ्या आठवड्यापासून धानपिकावर तुडतुड्याचा प्रादूर्भाव दिसून आला. दुसरीकडे जिल्हा कृषी विभागाने सबसिडीवर शेतकºयांसाठी औषधी उपलब्ध करून न दिल्याने बळीराजाला पुन्हा आर्थिक फटका सहन करावा लागला. जिल्ह्यासह तालुका पातळीवर शेतकºयांची महागडी औषध खरेदी करण्यासाठी लगबग दिसून आली. त्यातच बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडत गेला.
ज्या शेतकºयांना परवडत होते अशांनी धानावर फवारणी करून हातात आलेले पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दुसरीकडे धानावर तुडतुड्याचा प्रादूर्भाव कायम असतानाच मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत शनिवारी काही भागात सुसाट वाºयासह पावसाने हजेरी लावली. चौरास पट्ट्यात धानपिकाची नासाडी झाली. काही ठिकाणी कापूण ठेवलेल्या धानाच्या पेंढ्या ओल्या झाल्या. पाऊस अधिक बरसल्यास कापलेल्या पेंढ्या अधिक ओल्या होवून धान पाखर होण्याची भीतीही शेतकºयांनी व्यक्त केली आहे.
काही तालुक्यात कृषी अधिकारी बांध्यावर जावून शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहे. परंतु तालुक्यातील सर्वच शेतशिवारात जावून शेतकºयांना मार्गदर्शन केले जाऊ शकत नाही. अशा स्थितीत इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती शेतकºयांसमोर निर्माण झाली आहे.
रोग व किडीच्या प्रादूर्भावाने धानपिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना अधिकारी मात्र सर्व आलबेल आहे, असे सांगत आहेत. यंदा धान पीक बºयापैकी होण्याची आशा असताना आता काढणीच्या वेळी ढगाळी वातावरणाने चिंता वाढविली आहे.

तूर पिकावरही संक्रांत
जिल्ह्यात धान पीक लागवड होत असताना जागेच्या बांध्यावर तूर पिकाची लागवड केली जाते. सध्या तुरीला फूल उमलू लागली आहेत. अशा स्थितीत ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाचा हा बार झडू लागला आहे. परिणामी तूर पिकाच्या उत्पादनात घट तर होणार नाही ना, अशी चिंताही शेतकरी व्यक्त करीत आहे. तुरीवरही किडीचा प्रादूर्भाव जाणवत आहे.


Web Title: Cloudy weather lost a Rice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.