मुरुमाअभावी राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:33 IST2019-01-31T22:33:12+5:302019-01-31T22:33:28+5:30
महसूल प्रशासनाने अवैध गौण खनीज खनन प्रकरणी रायपूरच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला ५ कोटी ८६ लाखांचा दंड ठोठावल्याने आता मुरुमाअभावी राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने अपघाताची भीती वाढली आहे.

मुरुमाअभावी राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : महसूल प्रशासनाने अवैध गौण खनीज खनन प्रकरणी रायपूरच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला ५ कोटी ८६ लाखांचा दंड ठोठावल्याने आता मुरुमाअभावी राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने अपघाताची भीती वाढली आहे.
मनसर ते गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचा कामाला काही महिन्यापूर्वी सुरुवात करण्यात आली होती. या रस्त्याच्या भरावासाठी मोठ्या प्रमाणात मुरुमाचा वापर करण्यात आला. पंरतु मंजूर गौण खनीजापेक्षा अधिक मुरुम या कामावर वापरण्यात आले. त्यामुळे या कंपनीला महसूल विभागाने दंड ठोठावला आहे. परिणामी गत काही दिवसांपासून या रस्त्याचे काम बंद पडले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. पंरतु आता मुरुम आणि रेती अभावी काम रखडले आहे. आता या रस्त्यावर खोदकामाने पडलेल्या खड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.