तहसील कचेरी स्थांनातरणाविरुद्ध साकोलीत कडकडीत बंद

By Admin | Updated: December 9, 2014 22:44 IST2014-12-09T22:44:46+5:302014-12-09T22:44:46+5:30

येथील तहसील कार्यालयाची नवीन इमारत जुन्याच जागी बांधण्यात यावी व गडकुंभली मार्गावर सुरु असलेले बांधकाम थांबविण्यात यावे, या मागणीसाठी आज साकोली बंद व धरणे आंदोलन करण्यात आले.

Closing the tehsil proceedings against the transfer of land | तहसील कचेरी स्थांनातरणाविरुद्ध साकोलीत कडकडीत बंद

तहसील कचेरी स्थांनातरणाविरुद्ध साकोलीत कडकडीत बंद

साकोली : येथील तहसील कार्यालयाची नवीन इमारत जुन्याच जागी बांधण्यात यावी व गडकुंभली मार्गावर सुरु असलेले बांधकाम थांबविण्यात यावे, या मागणीसाठी आज साकोली बंद व धरणे आंदोलन करण्यात आले. या बंदला व्यापारी, फुटपाथ, दुकानदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे साकोलीचा व्यापार बंद होता. सहभागी आंदोलक कैलास गेडाम यांना पोलिसांनी मारहाण केल्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
साकोली तहसील कार्यालयाची इमारत आहे, त्या परिसरातच इतर शासकीय कार्यालये आहेत. बाहेरगाहून येणाऱ्यांना हे तहसील कार्यालय सोयीचे होते. त्यामुळे शासनाने साकोली तहसील कार्यालय जुन्याच ठिकाणी बांधण्यात यावी, अशी मागणी आहे. लाखनी, भंडारा येथे सर्व कार्यालये ही महामार्गाला लागून आहेत. साकोली तहसील कार्यालयाची इमारत ज्या ठिकाणी ही नवीन इमारत तयार होत आहे नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु करताना भूमिपूजन न करता काम सुरु करण्यात आले. त्यामुळे हे काम थांबवून नवीन बांधकाम जुन्याच जागेवर करण्यात यावे यासाठी साकोली तालुका सर्वपक्षीय नागरिक कृती समिती व साकोली व्यापारी असोसिएशनतर्फे साकोली बंद व आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवकुमार गणवीर, माजी आमदार डॉ.हेमकृष्ण कापगते, अविनाश ब्राम्हणकर, परमानंद मेश्राम, हेमंत भारद्वाज, अचल मेश्राम, अखिलेश गुप्ता, कैलाश गेडाम, अश्विन नशिने, उमेश भुरे, मार्कंड भेंडारकर, अण्णा सोनकुसरे, विजय साखरे, बाळकृष्ण हटनागर, प्रकाश करंजेकर, सुरेश बघेल, शैलेश गणवीर, शेषराव गिऱ्हेपुंजे, स्वर्णलता माकोडे, ताराबाई तरजुले, सुनिता कापगते, कौशल नंदेश्वर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Closing the tehsil proceedings against the transfer of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.