पाचवी ते आठवीच्या शाळा बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:30+5:302021-04-06T04:34:30+5:30
भंडारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहेत. अशात जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आणि बऱ्याच शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ...

पाचवी ते आठवीच्या शाळा बंद करा
भंडारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहेत. अशात जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आणि बऱ्याच शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा तत्काळ बंद करण्यात याव्यात, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा भंडारातर्फे करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी अर्चना जाधव यांना देण्यात आले.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत असताना जिल्ह्यातील शाळा मात्र सुरू आहेत. अशा कठीण परिस्थितीतही जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आणि बऱ्याच शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाचवी ते आठवीच्या शाळा तत्काळ स्वरूपात बंद करण्यात याव्यात, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. याशिवाय जिल्हा परिषद शिक्षकांच्या कोविड १९ करिता लागलेली एका शिक्षकाची सेवा दीर्घकाळ न लावता टप्प्याटप्प्याने लावण्यात यावी, जेणेकरून एका शिक्षकांवर अन्याय होणार नाही, तसेच वयाची ५३ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या व दिव्यांग शिक्षकांना, तसेच गंभीर आजार असलेल्या शिक्षकांना कोविड १९ च्या सेवेत वर्ग करण्यात येऊ नयेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना यादव यांना सोमवारी देण्यात आले. याप्रसंगी संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, ज्ञानेश्वर दमाहे, श्रावण लांजेवार, सुनील निनावे, विजय चाचेरे, विकास गायधने, सुरेश कोरे, विनायक कोसरे, भगवान गायधने, नेपाल तुरकर, संतोष चव्हाण, संजय आजबले, विश्वास सुखदेवे, टेकराम झलके, नरेंद्र रामटेके, योगेश पुडके, मंगेश नंदनवार, अरुण बघेले, आदेश बोंबार्डे, नरेश शिवरकर, हरिदास-धावडे, मुरारी कडव, विठ्ठल हारगुडे, बाळकृष्ण भुते, प्रेमलाल हातझाडे, केशव अतकरी, संजय झंझाळ, विनोद धुमनखेडे, महेश यावलकर, रषेस फटे, यशपाल बगमारे, दिलीप ब्राह्मणकर, नरेश कोल्हे, रवी नखाते, रवी उगलमुगले, अनिल सहारे, लीलाधर वासनिक, नंदू बिलवणे, भूषण ठाकरे व इतर जिल्हा तालुका संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.