शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

एका ‘क्लिक’वर कळणार शाळेचा दर्जा

By admin | Updated: February 17, 2017 00:42 IST

शालेय विद्यार्थी व पालकांना शाळेची गुणवत्ता एका क्लीकवर कळावी, यासाठी शासनाच्या वतीने राज्यस्तरावर शाळा सिध्दी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

संकेतस्थळाची निर्मिती : गुणवत्ता ठरविण्यासाठी शासनाचा शाळा सिद्धी उपक्रमरविंद्र चन्नेकर  बारव्हाशालेय विद्यार्थी व पालकांना शाळेची गुणवत्ता एका क्लीकवर कळावी, यासाठी शासनाच्या वतीने राज्यस्तरावर शाळा सिध्दी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शाळेच्या गुणवत्तेचा दर्जा ठरविण्यासाठी आता शासनाच्या वतीने शाळेतील शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता आदीचे मुल्यांकन होणार आहे. यासाठी राज्य शासनाने शाळा सिध्दी उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमात शाळांना आॅनलाईन पध्दतीने नोंदणी करावयाची आहे. स्वयं मुल्यमापनातून शाळेची श्रेणी ठरणार आहे. पालकांना आपल्या पाल्यासाठी शाळेची निवड करताना शाळेची गुणवत्ता कशी आहे हे त्या माध्यमातून एका क्लीकवर कळणार आहे. शाळेचा दर्जा ठरविण्यासाठी देशात एकच निकष ठेवण्यात आले आहे. शाळाबाह्य चौकशी करतांना इंटरनेटवर माहिती उपलब्ध केली जाणार आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या संकेत स्थळावर शाळाबाह्य माहिती दिली जाईल. शाळांना अ, ब, क असा दर्जा दिला जाईल.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत आणखी एका नव्या उपक्रमाची भर पडली आहे. शाळा निहाय उपक्रमाचे शाळेने राबविलेले उपक्रम नियमित सुरु राहावेत उपक्रमातील सातत्य टिकावे हा यामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भौतीक सुविधा गुणवत्तेच्या सुविधा यासाठी शाळेत राबविण्यात येणारे हसत खेळत ईलर्निंग याचा देखील या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान शाळेच्या शैक्षणिक दर्जाची माहिती यापूर्वी खासगी संस्थेच्या माहितीतून होत होती. आता राज्य शासनाने हा नवा उपक्रम सुरु केला आहे. यामधून पालकांना आपल्या परिसरातील कोणत्या शाळेत प्रवेश दयायचा याचीही माहिती आॅनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.३० मार्च २०१६ च्या शासन निर्णयानुसार शाळेची मानांकन करण्यात येत आहे. त्यामुळे समृध्द शाळांना राष्ट्रीय स्तरावरुन मानांकन मिळेल आणि त्यामुळे एक सकारात्म्क स्पर्धा निर्माण होईल व जास्तीत जास्त शाळा समृध्द करण्यासाठी, विद्यार्थी प्रगत करण्यासाठी ही प्रणाली फायदेशीर ठरणार आहे.या शाळा सिध्दी उपक्रमात सहभागी होणाऱ्या शाळांच्या मुल्यमापनासाठी समिती नेमण्यात येणार आहे. या समितीचे स्वरुप अद्यापही निश्चित नाही. शाळा सिध्दी उपक्रमाच्या नोंदणीसाठी १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत मूदत देण्यात आली होती. समितीचे स्वरुप स्पष्ट न करता अखेरीच मूदत देण्यात आल्याने शाळा प्रशासन मात्र द्विधा मनस्थितीत आहेत. नेमकी कोणाच्या प्रकारची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी समितीचे मार्गदर्शन आवश्यक आहे.