विस्तार अधिकाऱ्यासह लिपीक निलंबित

By Admin | Updated: September 24, 2016 01:43 IST2016-09-24T01:43:54+5:302016-09-24T01:43:54+5:30

कांद्री येथील २४ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोहाडी पंचायत समितीमार्फत सायकल वितरीत करण्यात आले

Clerical suspension with extension authority | विस्तार अधिकाऱ्यासह लिपीक निलंबित

विस्तार अधिकाऱ्यासह लिपीक निलंबित

भंडारा : कांद्री येथील २४ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोहाडी पंचायत समितीमार्फत सायकल वितरीत करण्यात आले होते. सायकली मंजुरी प्रकरणात नियम व घर ते शाळेचे अंतर या मुद्यांना डावलून ही फाईल जिल्हा समाज कल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. याप्रकरणी झालेल्या चौकशीत मोहाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ललीत कुंभरे व लिपीक रमेश खंगार हे दोषी आढळून आल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
विस्तार अधिकारी ललीत कुंभरे यांचेकडे समाज कल्याण विभागाचा प्रभार देण्यात आला होता. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांना ग्रामसभेतून निवड झाल्याचे प्रमाणपत्र, शाळेपासूनचे घरापर्यंतचे अंतर दोन किमीपेक्षा अधिक असल्याचे मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र, दारिद्र रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, खंडविकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जिल्हा परिषद समितीकडे सादर करावा लागतो.
कांद्री येथील विद्यार्थ्यांचे अर्ज पंचायत समिती येथे दाखल झाले होते. अर्जाची छाणनी व पाहणी करुन सहीनिशी २४ विद्यार्थ्यांचे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे विद्यार्र्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. सदर अर्जाची पाहणी मोहाडी पंचायत विस्तार अधिकारी ललीत कुंभरे व लिपीक रमेश कुंभरे यांनी केली होती. प्रकरण जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला पाठविले होते. प्रकरण अंगलट येण्याची भीती वाटताच त्यांनी पत्र पाठवून वाटप झालेल्या सायकली परत मागविले होते. कांद्री येथे जावून विद्यार्थ्यांजवळून सायकली परत मागण्याचा प्रयत्न सुध्दा करण्यात आला. त्यामुळे सायकल वाटप प्रकरण वाढले. समाज कल्याण अधिकारी व्ही. के. झिंगरे यांनी केलेल्या चौकशीत दोषी आढळून आल्यामुळे ललीत कुंभरे व लिपीक खंगार यांना निलंबित करण्यात आले. निलंबन काळासाठी त्यांना पंचायत समिती लाखनी येथे स्थानांतरण करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

कांद्री येथील २४ विद्यार्थ्यांना सायकल वाटप प्रकरणी मोहाडी पंचायत विस्तार अधिकारी ललीत कुंभरे व लिपीक रमेश खंगार चौकशीत दोषी आढळून आले. कुंभरे यांचेकडे समाज कल्याण विभागाचा कामकाज सोपविण्यात आला होता. नियमांना डावलून सायकल वाटपाचा प्रस्ताव पाठविला होता. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली.
- व्ही. के. झिगरे, समाज कल्याण अधिकारी, भंडारा.
कांद्री येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सायकली मंजुरीचे प्रस्ताव समाज कल्याण विभागाला ज्यादिवशी पाठविण्यात आले. त्यादिवशी मोहाडीचे खंडविकास अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या जागी प्रभारी सही करून प्रस्ताव पाठविला होता. या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले.
- ललीत कुंभरे, पंचायत विस्तार अधिकारी मोहाडी

Web Title: Clerical suspension with extension authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.