गणरायाच्या स्वागतासाठी राबविली ‘स्वच्छता मोहीम’

By Admin | Updated: September 5, 2016 00:42 IST2016-09-05T00:42:20+5:302016-09-05T00:42:20+5:30

गणरायाचे सोमवारला मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. अशा तारणहाराच्या स्वागतासाठी गणेशपूर ...

'Cleanliness campaign' implemented for Ganaraya's welcome | गणरायाच्या स्वागतासाठी राबविली ‘स्वच्छता मोहीम’

गणरायाच्या स्वागतासाठी राबविली ‘स्वच्छता मोहीम’

गणेशपूरच्या गणेशभक्तांचा उपक्रम : ठाणेदार, न.प. मुख्याधिकारी, सरपंचांचा सहभाग
भंडारा : गणरायाचे सोमवारला मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. अशा तारणहाराच्या स्वागतासाठी गणेशपूर येथील सन्मित्र गणेश उत्सव मंडळाच्या भक्तांनी आज गावात ‘स्वच्छता मोहिम’ राबवून त्याच्या स्वागताची जोरदार तयारी केली. यात भंडाराचे ठाणेदार, पालिका मुख्याधिकारी व गणेशपूरच्या सरपंचांसह अनेकांनी स्वत: हातात झाडू घेऊन ही मोहिम राबविली.
‘स्वच्छता परिसर, स्वच्छ गाव’ या संकल्पनेनुसार, गावात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. दहा दिवसांच्या मुक्कासाठी गणरायाचे सोमवारला मोठ्या थाटात आगमन होत आहे. मात्र, जो तारणहार नागरिकांच्या मनोकामना पूर्ण करतो. त्याच्या दहा दिवसात अनेक ठिकाणी अस्वच्छता राहते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवून आपल्या लाडक्या गणरायाला त्याच्या मुक्कामापर्यंत अस्वच्छतेचा त्रास होवू नये, या संकल्पनेतून गणेशपूरच्या सन्मित्र गणेश उत्सव मंडळाच्या गणेशक्तांनी जिल्हा परिसर चौक ते गणेश मंडळापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेली घाण स्वच्छ करून रस्ता साफ करण्यात आला.
अगदी पहाटेपासूनच गणेशभक्तांनी हातात झाडू घेवून स्वयंस्फूर्तीने रस्ता साफसफाई सुरू केली. या मोहिमेत मंडळाचे अध्यक्ष विनोद भुरे, उपाध्यक्ष गिरीश बेले, सचिव संजय भांडारकर, ग्रामपंचायत सरपंच वंदना भुरे, उपसरपंच यशवंत सोनकुसरे यांच्यासह गणेशभक्तांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यांची स्वच्छता मोहिम सुरू असताना गावातीलही युवकांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला.
या मोहिमेत संजय भांडारकर, केवल भुरे, चेतन अग्रवाल, लक्ष्मण गायधनी, भोला कमळकर, सावन बावणे, राकेश आंबीले, दिनेश भुरे, रामू भुरे, अनिल कावळे, विलास भुरे, संजय जांगजोड, विजय, लाकेश खोब्रागडे, विठ्ठल वंजारी, ग्रामपंचायत सदस्या माधुरी देशकर, लता हेडाऊ, सुभद्रा हेडाऊ, निता भांडारकर, वर्षा बोंदिले, कीर्ती गणवीर, रमेश माकडे, मनिष गणवीर, दिलीप मेहर, अनुप भांडारकर, अरूण अंबादे यांच्यासह गावकरी व युवकांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)

ठाणेदार, मुख्याधिकारी यांचा सहभाग
गणेशपूरच्या गणेशभक्तांनी गणरायाच्या आगमनापूर्वी गावात स्वच्छता मोहिम राबविल्याची माहिती भंडाराचे ठाणेदार यशवंत चव्हाण, वाहतूक निरीक्षक गोकूल राऊत व पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे यांना कल्पना मिळाली. त्यामुळे त्यांनीही गणरायाच्या निस्सीम भक्तीमुळे गणेशपूर गाठून हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. केवळ सहभागच घेतला नाही, तर सहभागी युवकांना स्वच्छता मोहिम निरंतर चालू ठेवावी, असे मार्गदर्शन केले.

Web Title: 'Cleanliness campaign' implemented for Ganaraya's welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.