जमुनिया गावात स्वच्छ भारत अभियान
By Admin | Updated: November 15, 2014 01:20 IST2014-11-15T01:20:31+5:302014-11-15T01:20:31+5:30
जवळच्या जमुनिया येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ ग्राम अभियान सुरू करण्यात आले आहे.

जमुनिया गावात स्वच्छ भारत अभियान
काचेवानी : जवळच्या जमुनिया येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ ग्राम अभियान सुरू करण्यात आले आहे. तिरोडा तालुक्यात स्वच्छ भारत अभियानास ८ तारेखपासून सुरूवात करण्यात आली असून ११ नोव्हेंबरपर्यंत सदर अभियान राबविण्यात आले.
जमुनिया येथे नोडल अधिकारी कृषी सहायिका हर्षविणा पडारे यांच्यामार्फत स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात करण्यात आली आली. या कार्यक्रमात संरपच तोमेश्वरी पटले, सदस्य नीता परतेती, पोलीस पाटील भाऊ गजभिये, अंगणवाडी सेविका विजयालक्ष्मी तुरकर, तंमुसचे दिगंबर रहांगडाले, कल्पना रहांगडाले, टेकचंद भैरम, जितेंद्र रहांगडाले, राधेश्याम रहांगडाले, हेमराज पटले आणि गंगा पटले या अभियानात प्रामुख्याने सहभागी झाले.
स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या दिवसापासून गावातील रस्ते, सार्वजनिक इमारती, सार्वजनिक शौचालय, मुत्रालय, अंगणवाडी इमारत, स्वयंपाक गृह इत्यादींची सफाई करण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानाकरिता नोडल अधिकारी म्हणून हर्षविणा पढारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आभियानासाठी हर्षविणा पढारे या मार्गदर्शन करीत असून स्वत: स्वच्छता अभियानात सहभागी होत आहेत.
या कार्यक्रमात ग्रा.पं. सदस्य, महिला मंडळ कार्यकर्त्या, गावातील नागरिक प्रामुख्याने आणि स्वेच्छेने भाग घेत असल्याची माहिती हर्षविणा पढारे यांनी लोकमतला सांगितली आहे.
गोंदिया : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा फुलचूर येथे ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ अंतर्गत जि.प. सदस्य राजेश चतुर यांनी शाळेला भेट दिली व शाळा स्वच्छता अभियानात भाग घेऊन मार्गदर्शन केले.
शाळेतील पिण्याच्या पाण्याची समस्या व इतर सुखसुविधा लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी मुख्याध्यापक सी.व्ही. मेश्राम यांनी एक निवेदनसुध्दा दिले. या स्वच्छता अभियान अंतर्गत शालेय पटांगणाची साफसफाई करण्यात आली. सदर अभियानसाठी आर.एच. रहांगडाले, पी.के. गहेरवार, जी.बी. बोपचे, एस.बी. रामटेके, जी.बी. मेंढे, डी.एम. बागडे या सर्व शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष येमेंद्र येरकडे व रामेश्वर दहीकर, बेबी, सुलोचना येरकडे व सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)