गटशिक्षणाधिकारी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास!

By Admin | Updated: January 24, 2015 22:50 IST2015-01-24T22:50:23+5:302015-01-24T22:50:23+5:30

जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी कॉन्व्हेंटच्या तुलनेत गुणवत्तेत कमी ठरतात. जिल्हा परिषद शाळा व खाजगी कॉन्व्हेंट यांच्यातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासात तफावत आहे. जिल्हा परिषद

Classes of students taken by the Group Officials! | गटशिक्षणाधिकारी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास!

गटशिक्षणाधिकारी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास!

भुयार : जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी कॉन्व्हेंटच्या तुलनेत गुणवत्तेत कमी ठरतात. जिल्हा परिषद शाळा व खाजगी कॉन्व्हेंट यांच्यातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासात तफावत आहे. जिल्हा परिषद शाळामधील शिक्षण कॉन्व्हेंटच्या शिक्षणापेक्षा कमकुवत आहे, असा आरोप नेहमी पालक करतांना दिसतात.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीही हुशार व गुणवत्तेत उतरावा यासाठी पंचायत समिती पवनीचे गटशिक्षणाधिकारी शामकर्ण तिडके यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळेला भेटी दिल्या. वर्गनिहाय विद्यार्थ्यांना लेखन, वाचन व बौध्दीक प्रश्न करुन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. हजेरी क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना बोलावून शैक्षणिक प्रगती किती झाली व त्यासाठी समोर काय करावे लागणार यासंबंधी शिक्षकांशी चर्चा करुन ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी आहे, त्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी लक्ष देण्याच्या सुचना देण्याचे कार्य करीत आहे. तर जे विद्यार्थी अभ्यासात हुशार आहेत, त्यांच्या ज्ञानात आणखी कशी भर पडेल यासंबंधी शिक्षकांशी हितगुज करतात. गटशिक्षणाधिकारी यांच्या उपक्रमाचे पालक वर्गात स्वागत केल्या जात असून त्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत.(वार्ताहर)

Web Title: Classes of students taken by the Group Officials!