तुमसर शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत
By Admin | Updated: July 20, 2015 00:25 IST2015-07-20T00:25:47+5:302015-07-20T00:25:47+5:30
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता तुमसर नगरपालिकेने ठोस पाऊले उचलत ईदच्या पावन ..

तुमसर शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत
प्रथम चरणात : ४० मुख्य चौकात कॅमरे सुरु
तुमसर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता तुमसर नगरपालिकेने ठोस पाऊले उचलत ईदच्या पावन पर्वावर शहरातील ४० मुख्य चौकात सीसीटीव्ही लावण्याच्या कार्याला शुभारंभ करण्यात आल्याने शहरात मजनुगिरी करणारे महिलेची छेडछाड करणारे चोऱ्या, दरोडा, घातपात करणाऱ्याची आता खैर नाही.
कार्यक्रमाचे उद्घाटन सराफा असो. चे अध्यक्ष डॉ. गौरीशंकर कारेमोरे यांच्या हस्ते तर पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बुरडे, माजी नगराध्यक्ष जगदिश कारेमोरे, पोलीस निरीक्षक किशोर गवई, विद्यमान नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, उपाध्यक्षा सरोज भुरे, तरुण सोनी तसेच सर्व नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी ठरली असतांनाच सर्वसामान्य नागरिकही दशहती खाली आल्याने कुठेतरी गुन्हेगारीवर आळा घालता यावा याकरिता सर्व नगरसेवकासह नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे हे प्रयत्नशिल असतांना जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती.
पंरतू डीपीडीसी चा नियोजन झाल्यामुळे आर्थिक मदत मिळू शकली नाही. दरम्यान न खचता शहरातील सर्व सामाजिक संघटनांना एकत्र आणून त्यांच्या थोड्याफार मदतीच्या आधारावर शहरात दोन चरणात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्याची प्रक्रिया होणार असून प्रथम चरणात शहरातील ४० मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कार्याला सुरुवात झाली असून त्या कॅमेराची रेकॉर्डिंग डी.व्ही.आर मध्ये होणार आहे. तर दुसऱ्या चरणाचे काम लवकरात लवकर सुरु करुन शहरातील प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रावधान आहे. नगरपरिषद तसेच पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र मॉनिटर उघडण्यात आले आहे.
प्रत्येक घटनांवर नजर ठेवणे सहज शक्य होणार असून सराफा असो. लायन्स क्ल्ब, जे.सी.आय. सारख्या मोठ्या संघटनेनी नगरपरिषदला आर्थिक सहकार्य करुन शहराची शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्याकरिता मदत करण्याचे आव्हान नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)