शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

येदरबुची येथे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:20 AM

अतिथी देवो भवं असे म्हटले जाते, परंतु दुष्काळात तीव्र पाणीटंचाईच्या रौद्र रुपाने नातेवाईकांनी गावात मागील तीन वर्षापासून येणे बंद केले आहे. गावाच्या मुलींनी माहेराकडे पाठ फिरविल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. पाणीटंचाईमुळे नाते तुटलेले गाव अशी ओळख व प्रसिद्धी तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल येदरबुचीला मिळत आहे.

ठळक मुद्देव्यथा गावाची : सलग तीन वर्षापासून पाणीटंचाई, प्रशासनाच्या योजना तोकड्या

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अतिथी देवो भवं असे म्हटले जाते, परंतु दुष्काळात तीव्र पाणीटंचाईच्या रौद्र रुपाने नातेवाईकांनी गावात मागील तीन वर्षापासून येणे बंद केले आहे. गावाच्या मुलींनी माहेराकडे पाठ फिरविल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. पाणीटंचाईमुळे नाते तुटलेले गाव अशी ओळख व प्रसिद्धी तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल येदरबुचीला मिळत आहे. आदिवासी बांधवांच्या विकासाकरिता शासन घसा कोरडा होतपर्यंत कटीबद्ध असल्याचे सांगते. परंतु वास्तविक परिस्थिती मोठी भयानक असल्याने गावाला भेट दिल्यानंतर प्रत्यय येतो.तुमसर तालुक्यातील येदरबुची हे गाव १०० टक्के आदिवासी बहुल आहे. गावाची लोकसंख्या १२०० इतकी आहे.या गावात मागील तीन वर्षापासून दुष्काळसदृष्य स्थिती असून तीव्र पाणीटंचाई सुरु आहे. गावापासून एक ते दीड किमी अंतरावरील शेतशिवारातील विहिरीतून पहाटे तीन पासून पाण्याकरिता महिला पुरुष पाण्याकरिता पायपीट करताना दिसतात.गावाशेजारी आंतरराज्यीय बावनथडी धरण आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावाला ३० हजार लिटरचा जलकुंभ बांधण्यात आला. मात्र तो आठवड्यातून केवळ एकदाच केवळ १५ हजार लिटरच भरला जातो. दैनंदिन गरज या पाण्याने कशी भागणार याकरिता ग्रामस्थ शेतशिवाराकडे पाण्यासाठी धाव घेताना येथे दिसतात. पहाटे ३ पासून ग्रामस्थांच्या रांगा विहिरीवर लागत आहेत.विहिरीतील गढूळ पाण्याने तृष्णा भागवावी लागत असल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ता अनिल टेकाम यांनी केली.प्रशासनाच्या नियोजनाअभावी येदरबुी ग्रामस्थांना त्याचा मोठा फटका बसत आहे. गावातील इतर विहिरींनी मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. केवळ एका विहिरीवर हे गाव सध्या तहान भागवित आहेत. पाणी मिळविणे येथे मोठे अग्नीदिव्य ठरत आहे. धरण उशाला व कोरड घशाला अशी स्थिती येथे दिसत आहे.पाणीटंचाईमुळे नातलगांनी फिरविली पाठयेदरबुची येथे मागील तीन ते चार वर्षापासून तीव्र पाणी टंचाई आहे. येथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे नातेवाईकांनी या गावाकडे पाठ फिरविली आहे. मागील तीन वर्षापासून येदरबुची येथे पाहुणेमंडळी येत नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. येथील महिला राजलिला टेकाम, भीमाबाई कुंभारे यांनी मोठ्या जळजळीत प्रतिक्रिया दिल्या. गावातील मुली माहेरी येत नाही, तर येथील बहिणीकडे भाऊ व बहिणी दुष्काळामुळे आमच्या गावाला येत नाही.प्रशासनाचे तेच उत्तरयेदरबुची येथील पाणीटंचाईबाबत प्रशासन गंभीर दिसत नाही. ग्रामस्थांबरोबर जनावरेही गढूळ पाणी पीत आहेत. पाण्याअभावी घरकुलांचे बांधकाम येथे थांबले आहे. येथील स्थानिक प्रशासन माहिती घेऊन उपाययोजना राबवणार असल्याचे ठराविक उत्तरे देत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई