योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

By Admin | Updated: August 25, 2015 00:49 IST2015-08-25T00:49:42+5:302015-08-25T00:49:42+5:30

समाजातील प्रत्येक माणसाला जीवन जगताना काही अडथळे येऊ नयेत यासाठी शासनातर्फे जसे कायद्याची तडजोड करण्यात आली आहे.

The citizens should take advantage of the schemes | योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

तलमले यांचे आवाहन : पिंडकेपार येथे समाधान योजना शिबिर
साकोली : समाजातील प्रत्येक माणसाला जीवन जगताना काही अडथळे येऊ नयेत यासाठी शासनातर्फे जसे कायद्याची तडजोड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. ज्यांचे पालन पोषण करणारे कोणी नाही अशा गरजूंसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यामुळे नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्कसाधून शासकीय योजनाचां लाभ घ्यावा असे मत उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांनी व्यक्त केले.
महसूल विभागातर्फे तालुक्यातील पिंडकेपार येथे आयोजित महाराजस्व अभियानाचे विस्तारित स्वरुपातील समाधान योजना शिबिरात तलमले बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार डॉ. हंसा मोहणे, उपविभागीय अभियंता व्ही. डी. कांबडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. डब्ल्यू. सुखदेवे, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, पंचायत समिती सदस्य उषा डोंगरवार, सरपचं कऱ्हाडे, नंदु समरीत, मंडळ अधिकारी संजय बंसोड, खंडविकास अधिकारी झंझाड, उपसरपंच माणिक कापगते, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज भोयर, सहायक निबंधक ढोमणे, पुरवठा निरीक्षक धपाडे उपस्थित होते. या कार्यक्रमात ९३ आदिवासी बांधवांना वनहक्क जमिनीची वनपट्टे सातबाराला नाव दर्ज करुन पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. यानंतर राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय योजनेची दोन लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयाचे धनादेश देण्यात आले. या समाधान शिबिरात १० विभागाचे शिबिर लावण्यात आले होते. यात महसुल विभाग, कृषी विभाग, परिवहन विभाग, भूमी अभिलेख, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध विभाग, सेतु केंद्र, महिला व बालविकास, सहायक निबंध कार्यालय, पोलस विभाग हे त्यांच्या विभागामार्फत लोकांना माहिती देत होते.यात महसूल विभागांतर्गत पुरवठा विभागामार्फत ३० रेशनकार्ड वाटप करण्यात आले. ५० आधारकार्डची नोंदणी करण्यात आली. २५ ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. २७ लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप् करण्यात आले. प्रास्ताविक मंडळ अधिकारी आर. पी. निंबार्ते यांनी केले. संचालन व आभार एस. एम. ठाकरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The citizens should take advantage of the schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.