नागरिकांनी मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा
By Admin | Updated: May 21, 2017 00:24 IST2017-05-21T00:24:51+5:302017-05-21T00:24:51+5:30
प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती जनेतेस व्हावी या उद्देशाने सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणीसाठी रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

नागरिकांनी मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा
राजेश काशिवार : रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती जनेतेस व्हावी या उद्देशाने सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणीसाठी रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामुळे योजनेची निश्चितच जनजागृती होईल, असे प्रतिपादन आमदार राजेश काशिवार यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय महिला आणि आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत प्रसार व प्रचार करण्यासाठी सुशिक्षित तरुण-तरुणी, रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळावा तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा संचालित माहेश्वरी लोकसंचालीत साधन केंद्र लाखांदुर यांचे वार्षिक सर्वसाधारण सभा आशिर्वाद मंगल कार्यालय लाखांदूर येथे आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून लाखांदुरच्या नगराध्यक्षा निलीमा हुमणे, जिल्हा समन्वय अधिकारी प्रकाश हिवाळे, स्टॉर मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्राचे श्री. सोनकुसरे, पंचायत समिती लाखांदूरचे माजी सभापती नुतन कांबळे, शुध्दोमता नंदागवळी, निर्मला देशमुख उपस्थित होते.
आमदार काशिवार पुढे म्हणाले की, महिला आर्थिक बचत गट हा महिलांचा आर्थिक दर्जा उंचावा यासाठी निर्माण करण्यात आले आहे. परंतु बचत गटांना मिळणाऱ्या कजार्चे पाहिजे त्या कायार्साठी न होता वेगळयाच कारणासाठी होत आहे. त्यामुळे शासनाने अटी व शर्ती नेमून दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. बचत गटांनी मिळालेल्या कजार्चा उपयोग व्यवसाय व उद्योगासाठी केल्यास कजार्चे योग्य नियोजन तसेच योग्य परतफेड केल्यास पात्र लाभार्थ्यांना पुन्हा कर्ज मिळू शकते, असे ते म्हणाले. महिलांनी नोकरी मिळविण्याकडे न पाहता स्वत:चा उद्योग व्यवसाय करुन नौकरी देणारे कसे होऊ शकतो या कडे लक्ष दिले पाहिजे. महिला बचत गटाने स्वयंरोजगारावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
लाखांदूरच्या नगराध्यक्षा हुमणे म्हणाल्या की, स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले? व सावित्रीबाईनी पुढाकार घेतला. सावित्रीबाईस शिक्षित करुन त्यांना महिलांचे आद्यशिक्षक केले. त्याकाळात ही फार मोठी क्रांतीकारी घटना होती. यासाठी त्यांनी फार त्रास सहन केला. आज आपण शिक्षित झालो ही त्यांची पुण्याई आहे, असे त्या म्हणाले.बचत गटामध्ये अनेकदा सदस्यांचे हेवेदाव्यामुळे कर्ज मिळण्यास विलंब लागतो व मुळ उद्देशापासून आपण भटकतो. याचे भान महिला बचत गटांनी ठेवले पाहिजे. मिळाणाऱ्या कर्जाचे योग्य उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले. महिला बचत गटांनी लहान लहान उद्योग करुन आपल्या उद्योगास मोठे स्वरुप प्राप्त करुन दयावे. तरच महिला सक्षमीकरणाचा उद्देश साध्य झाला असे म्हणता येईल.
यावेळी स्टॉर मार्गदर्शन केंद्राचे सोनकुसरे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेबाबत मार्गदर्शन करतांना या योजनेचे शिशु, किशोर व तरुण असे तीन स्तराबाबत माहिती दिली. पहिल्या टप्प्यात ५० हजारापर्यंत, दसऱ्या टप्प्यात ५० हजारावर व तिसऱ्या टप्प्यात ५ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक प्रकाश हिवाळे यांनी केले तर संचालन तालुका समन्वयक श्रीमती धुर्वे यांनी केले. या कार्यक्रमास तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. या मेळाव्यास तालुक्यातील ५०० महिलांचा सहभाग होता.