नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:33 IST2021-03-08T04:33:07+5:302021-03-08T04:33:07+5:30
माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यात एकूण ३८ कुक्कुटपालन केंद्र आहेत. या केंद्रापैकी जवळपास ८ केंद्र विविध कारणांनी बंद असून उर्वरित ३० ...

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यात एकूण ३८ कुक्कुटपालन केंद्र आहेत. या केंद्रापैकी जवळपास ८ केंद्र विविध कारणांनी बंद असून उर्वरित ३० केंद्र सुरू आहेत. या केंद्रात जवळपास ५२ हजार ७०० कोंबडे पक्षी असून या पक्ष्यात ब्रायलर व कॉक्रल या प्रजातीचा समावेश असल्याची माहिती आहे. मात्र, गत काही दिवसांपासून या पक्ष्यांना बर्ड फ्लू आजाराचा संसर्ग झाल्याच्या बातम्यांनी नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसायिकांसह चिकन विक्रेते व ग्राहकांत भीती निर्माण होऊन खरेदी-विक्रीत कमालीची घट झाल्याची माहिती आहे. मात्र, सद्य:स्थितीत लाखांदूर तालुक्यात बर्ड फ्लू या आजाराचा या पक्ष्यांवर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले नाही, असे सांगत या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नियमित कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या संपर्कात असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. सोनकुसरे यांनी दिली.