देव्हाडा येथील नागरिकांची शुद्ध पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST2021-06-05T04:25:44+5:302021-06-05T04:25:44+5:30

तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या तीन हजार लोकवस्तीच्या देव्हाडा (बु) ग्रा.पं.च्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी २०१८-२०१९ या वर्षात तीन ...

Citizens of Devhada wander for pure water | देव्हाडा येथील नागरिकांची शुद्ध पाण्यासाठी भटकंती

देव्हाडा येथील नागरिकांची शुद्ध पाण्यासाठी भटकंती

तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या तीन हजार लोकवस्तीच्या देव्हाडा (बु) ग्रा.पं.च्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी २०१८-२०१९ या वर्षात तीन लाख रुपये ग्रामपंचायतीच्या सामान्य निधीतून खर्च केले. गावातील गरजू नागरिकांसाठी दहा रुपयात वीस लिटर या तत्त्वावर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा आरो प्लाँट उभारला होता; परंतु हा आरो प्लाँट तत्कालीन सरपंच, सचिव, उपसरपंच व सदस्यांच्या दुर्लक्षितपणामुळे देखभाल दुरुस्तीअभावी तांत्रिकदृष्ट्या बिघडल्याने तीन लाख रुपयांचा शुद्ध पिण्याचा पाण्याचा आरो प्लाँट दोन वर्षांपासून बंद पडला आहे. परिणामी, येथील तीन हजार लोक वस्तीतील तीनशे कुटुंबीयांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

कोट

शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या आरो प्लाँटमधील गेल्या पंधरा महिन्यांचे थकीत विद्युत बिल पंचावन्न हजार रुपये आहे, तर आरो प्लाँट मशीन दुरुस्तीसाठी एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सद्य:स्थितीत ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. फंडात पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने आरो प्लाँट दुरुस्त करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आरो प्लाँट बंद आहे.

भाऊराव लाडे,

उपसरपंच ग्राम पंचायत, देव्हाडा (बु )

Web Title: Citizens of Devhada wander for pure water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.