प्रतिबंधक औषधीसाठी नागरिकांची गर्दी
By Admin | Updated: August 30, 2014 23:27 IST2014-08-30T23:27:50+5:302014-08-30T23:27:50+5:30
तुमसर-बपेरा राज्य मार्ग क्रमांक २७१ वर असलेल्या मोहगाव खदान गावात पोळ्याच्या पाडव्याला विष प्रतिबंधक औषधींचे वाटप करण्यात आले आहे. यंदा ४० हजार नागरिकांनी या औषधीचा लाभ घेतला आहे.

प्रतिबंधक औषधीसाठी नागरिकांची गर्दी
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्ग क्रमांक २७१ वर असलेल्या मोहगाव खदान गावात पोळ्याच्या पाडव्याला विष प्रतिबंधक औषधींचे वाटप करण्यात आले आहे. यंदा ४० हजार नागरिकांनी या औषधीचा लाभ घेतला आहे.
सर्पदंश वरिल विष प्रतिबंधक औषधीचे वाटप मोहगाव खदान गावात गेल्य ७० वर्षापासून पिपरेवार आणि चौरागडे कुटूंब करित आहेत. ही औषध नि:शुल्क वाटप करण्यात येत आहे. प्रती व्यक्ती औषधीचे सेवन करताना सतत तीन वर्षाचा कालावधी सांगण्यात येत आहे. या कालावधीचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास त्याचा मृत्यु होत नाही. त्याला अन्य औषधीउपचारासाठी बराच कालावधी प्राप्त होतो. विष प्रतिबंधक प्रक्रिया शरीरात ही औषध तयार करीत असल्याची माहिती औषध वाटप करणारे कुटूंबियांनी दिली. वर्षातून एकदाच पोळ्याच्या पाडव्याला ही औषध वाटप करण्यात येत आहे. औषधीचे कंद असल्याने गुळात मिश्रन केले जाते. या गुळाचे राशी घेतल्या जात नाही. औषधीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांच्या गर्दीत वाढ हेत आहे. यंदा या नागरिकांची गैरसोय होणार नाही याकरीता गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. या औषधी करीता मध्य प्रदेश, विदर्भ तथा मध्य महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून लहान मुलासह महिला व पुरूष हजेरी लावतात. पहाटे ४ वाजता नागरिकांची उपस्थिती राहत असल्याने, त्यांना सोयी देण्यासाठी उपाय योजना करण्यात आली.
दावेझरी टोला गावाच्या हद्दीत असलेल्या जिल्हा परिषद शाळा व समाज मंदिरात औषधी वितरण करण्याची सोय करण्यात आली. पिण्याचे पाणी टँकरने उपलब्ध करण्यात आले. या शिवाय लहान बालकांचा समावेश असल्याने अल्पोहार वाटपाची सोय गावकऱ्यांनी उपलब्ध केली. या कार्यक्रमात अल्पोहार वितरण जि.प. सदस्य राजेश पटले यांचे हस्ते पं.स. सदस्य हिरालाल नागपुरे, बंटी बानेवार, सरपंच गिता कटरे, सरपंच गायत्री चौरागडे तथा गाकवऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. (वार्ताहर)