पोलीस बंदोबस्तात तंटामुक्त अध्यक्षपदाची निवड

By Admin | Updated: September 23, 2016 00:39 IST2016-09-23T00:39:58+5:302016-09-23T00:39:58+5:30

येथील सर्व ग्रामवासीयांनी एकत्र येवून १९ सप्टेंबरला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.

The choice of the post of president in a police constable | पोलीस बंदोबस्तात तंटामुक्त अध्यक्षपदाची निवड

पोलीस बंदोबस्तात तंटामुक्त अध्यक्षपदाची निवड

महिलांचा सक्रिय सहभाग : गोंडउमरीतील प्रकार
गोंडउमरी : येथील सर्व ग्रामवासीयांनी एकत्र येवून १९ सप्टेंबरला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. १३ सप्टेंबरला पुरूष गट व महिला गट असे दोन गटात सभा झाली होती परंतु १९ सप्टेंबरला महिलांचा सक्रीय भाग घेवून गावातील दारूबंदीचा प्रस्ताव मांडण्यात आल्यानी पुरूष मंडळींनी ग्रामसभा बरखास्त केली. १९ सप्टेंबरला तंटामुक्त समितीची कार्यकारणी गठित करण्यासाठी महिला वर्गाचा १०० टक्के सहभाग असल्यानी मतदान प्रक्रियेत महिलेमध्ये पौर्णिमा भागवत चांदेवार हिचा ७५ मतांनी विजय घोषित करण्यात आले.
पुरूष गटामधून तेजराम पाऊलझगडे यांचा पराभव झाले. पुरूष गट व महिला गट या दोन विरूद्ध गटात महिलांनी बाजी जिंकली. त्यामुळे गावातील अवैध धंदे यांचे धाबे दणाणले आहे. साकोली तालुक्यातील गोंडउमरी येथे तंटामुक्त पदाच्या निवडीकरीता भंडारा येथील पोलीस बंदोबस्त सुरक्षा जवान बोलविण्यात आले. एकूण दोन पीएसआय, दोन ठाणेदार, ४० पोलीस जवानाचा समावेश होता.
यामध्ये पुरूष व महिलामध्ये एकूण ६५५ मतदान झाले. त्यात पुरूषाला २९० मतदान मिळाले व महिलेला ३६५ मतदान घेतले. ७५ मतानी विजय झाल्यानी गावात महिलेमध्ये उत्साह निर्माण झाले. या गावात महिला राज स्थापन झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
गावातील युवक, तरूणपिढी शाळकरी मुले हे दारूच्या आहारी जाऊन अनेक कुटूंब उध्दवस्त होण्याच्या मार्गावर असताना येथील महिला मंडळींनी गावातील चित्र बघताच भूमिका घेतली व सर्व महिला वर्गनी ठाणेदाराला दारूबंदीचा प्रस्ताव सादर करून परिसरातील व गावातील अवैध दारू बंद झालीच पाहिजे, असे नारे बाजी करूण महिलानी संकल्प हाती घेतले आहे. (वार्ताहर)

Web Title: The choice of the post of president in a police constable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.