चितळाला जीवनदान :
By Admin | Updated: March 22, 2016 00:43 IST2016-03-22T00:43:15+5:302016-03-22T00:43:15+5:30
साकोली महामार्गावर दांडेगाव जंगलामध्ये पाण्याच्या शोधात फिरत असलेला चितळ अचानक राज्य मार्गावर आला.

चितळाला जीवनदान :
चितळाला जीवनदान : साकोली महामार्गावर दांडेगाव जंगलामध्ये पाण्याच्या शोधात फिरत असलेला चितळ अचानक राज्य मार्गावर आला. दरम्यान एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जखमी झाला. अशातच प्रवास करत असलेले दांडेगाव येथील श्रीराम कांबळे, चिचोलीचे विधावान नैताम, अंकुश कुलसंगे, यांनी या जखमी चितळाला पाणी पाजले. त्यानंतर पशुवैद्यकीय रूग्णालयात नेले. तिथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी चितळावर उपचार केले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चितळाला जंगलात सोडून दिले.