चायनीज खाल तर ‘अ‍ॅडमीट’ व्हाल

By Admin | Updated: September 25, 2014 23:18 IST2014-09-25T23:18:34+5:302014-09-25T23:18:34+5:30

आज भारतात चायनीजने वसतुंनी बाजारपेठ व्यापली आहे की, आपण बाहेर भोजन करायला गेलो असता आपली पहिली पसंती चायनीज डिशच असते. चायनीज पदार्थांनी सर्वांनाच चटक लावली आहे.

Chinese will be 'Admit' | चायनीज खाल तर ‘अ‍ॅडमीट’ व्हाल

चायनीज खाल तर ‘अ‍ॅडमीट’ व्हाल

भंडारा : आज भारतात चायनीजने वसतुंनी बाजारपेठ व्यापली आहे की, आपण बाहेर भोजन करायला गेलो असता आपली पहिली पसंती चायनीज डिशच असते. चायनीज पदार्थांनी सर्वांनाच चटक लावली आहे.
चायनीज पदार्थांचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामध्ये वापरण्यात येत असलेल्या अजिनोमोटोमुळे आरोग्यही बिघडण्याची दाट शक्यता आहे. अनेकांना चायनीजचे अतिप्रमाणात सेवन केल्याने दवाखान्यात अ‍ॅडमीट होण्याची वेळ आली आहे.
आपल्याला चायनीज गोष्टींचे आकर्षण पहिल्यापासूनच आहे. अगदी चिनी बनावटीच्या वस्तूंपासून चायनीज पदार्थांपर्यंत चायनीज पदार्थांची तर सध्या सर्वांना चटक लागली आहे. चीनमध्ये मिळणारे चायनीज पदार्थ व भारतात मिळणारे चायनीज पदार्थ यात फरक आहे.
भारतीयांच्या जिभेला पूरक ठरतील, अशा चवीचे हे पदार्थ तयार केले जातात. रस्त्याशेजारी फुटपाथवर गल्लोगल्ली मिळणारे चायनीज पदार्थ सहज आणि स्वस्तात उपलब्ध असल्यामुळे तेच खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. हॉटेल आणि रेस्टारेंटच्या तुलनेत हे पदार्थ स्वस्तात द्यायचे तर त्यांचे कूक अनेक तडजोडी करतात. त्यात निकृष्ट दर्जाचे तेल आणि भाज्या वापरले जातात. त्याहीपेक्षा आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात वापरला जाणारा अजिनोमोटो पचनसंस्थेसह शरीराचे इतरही नुकसान करू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मैदा आतड्यात जाऊन चिकटत असल्यामुळे त्याचा अतिरेकी वापर घातक आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Chinese will be 'Admit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.