स्टोव्हचा भडक्यात महिलेसह चिमुकला भाजला

By Admin | Updated: April 26, 2015 00:42 IST2015-04-26T00:42:05+5:302015-04-26T00:42:05+5:30

स्टोव्हवर स्वयंपाक करताना भडका उडाला. यात महिलेसह तिचा दोन वर्षीय मुलगा भाजला.

Chimukala with a woman in the stove, she gets burnt | स्टोव्हचा भडक्यात महिलेसह चिमुकला भाजला

स्टोव्हचा भडक्यात महिलेसह चिमुकला भाजला

रूग्णालयात उपचार सुरू : तुमसर तालुक्यातील देवरीदेव येथील घटना
तुमसर : स्टोव्हवर स्वयंपाक करताना भडका उडाला. यात महिलेसह तिचा दोन वर्षीय मुलगा भाजला. सध्या त्यांच्यावर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास देवरीदेव येथे घडली. नशीब बलवत्तर म्हणून मायलेक थोडक्यात बचावले.
रात्रीचा स्वयंपाक करण्याकरिता स्वाती अमृत कटरे (२२) या स्टोव्ह सुरू करीत होत्या. अचानक स्टोव्हचा भडका उडाला. यात स्वाती गंभीर भाजल्या गेल्या. यावेळी त्यांच्याजवळ दोन वर्षीय मुलगा रूद्र होता. या भडक्यात तोही गंभीर भाजला गेला. सुमारे १५ ते १७ टक्के ते दोघे भाजले गेले. घटनेची माहिती होताच नागरिकांनी त्यांना सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
सिहोरा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात आकस्मीक भाजणे, अपघातग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. परंतु उपचाराकरिता येथे तितकीच सोयी सुविधा पुरविण्याची गरज आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. कोट्यवधींचे रुग्णालय केवळ शोभेची वास्तू ठरता कामा नये, याची दक्षता घेणे तितकेच महत्वाचे आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Chimukala with a woman in the stove, she gets burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.