विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 00:33 IST2017-06-28T00:33:23+5:302017-06-28T00:33:23+5:30
सिरीज चालू करीत असताना विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने आमगाव येथील दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू
गावात शोककळा : आमगाव येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव (दिघोरी) : सिरीज चालू करीत असताना विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने आमगाव येथील दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
सौरभ अभय नेवारे, असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. गावाबाहेर फेकलेली बिघडलेली सिरीज आणून तिला सुरु करण्याचा प्रयत्न करीत असताना सौरभला विद्युतचा जबर धक्का बसला. तो खाली कोसळला. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो आमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चवथ्या वर्गात शिकत होता. त्याच्यामागे आई,वडील, एक बहीण आहे. घटना माहित होताच शाळेला सुटी देण्यात आली. गटशिक्षणाधिकारी चरपे, विस्तार अधिकारी राठोड, मुख्याध्यापक गिऱ्हेपुंजे व शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले.