बालकांचा किलबिलाट सुरु

By Admin | Updated: June 27, 2015 00:51 IST2015-06-27T00:51:53+5:302015-06-27T00:51:53+5:30

नवा गणवेश, नवी पुस्तके, बॅग अन् नवे सवंगडी सोबत घेवून शाळेला स्कूल चले हम असे म्हणत

Children's twitter started | बालकांचा किलबिलाट सुरु

बालकांचा किलबिलाट सुरु

शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत विद्यार्थ्यांना पुस्तके, मिष्ठान्न, भोजनाचे वाटप
शिवशंकर बावनकुळे साकोली
नवा गणवेश, नवी पुस्तके, बॅग अन् नवे सवंगडी सोबत घेवून शाळेला स्कूल चले हम असे म्हणत शिक्षणाच्या वाटेवरील चिमुकल्यांनी हसत खेळत शाळेच्या पहिल्या दिवशी आज उपस्थिती लावली. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उन्हाळी सुट्यांचा आनंद घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार शाळेच्या प्रांगणात आपल्या सवंगड्याांची विचारपूस केली हसण्या, खेळण्यानी शाळेचा परिसर असा गजबजून जाऊन पुन्हा बच्चे कंपनीची किलबिलाट सुरु झाली.
जवळपास दोन महिन्याच्या प्रदीर्घ उन्हाळी सुटीनंतर शाळातील घंटा आज पुन्हा खणाणली, नवीन ड्रेस, कंपास पेटी, वह्या, दप्तर आदी घेवून बच्चे कंपनी शाळेत पोहचली. तेव्हा पहिल्या दिवशीचा ठोका कानावर पडताच विद्यार्थी आनंदले, त्यांनी पहिल्या दिवशी धम्माल मस्ती केली.
शाळेच्या पायऱ्या चढताच नवजीव कॉन्व्हेंट (सीबीएससी) प्राचार्य सैय्यद व मुख्याध्यापक समरित यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून एक वेगळ्या स्वरुपाचा त्यांना आनंद झाला. शाळेची पहिली घंटा वाजताच मुले शिस्तीत रांगेत उभे राहिली आणि एका सुरात राष्ट्रगीत गाऊ लागले. दोन महिन्यापासून एकांत सहन करणाऱ्या शाळेचा परिसर गजबजून गेला. जिल्हा परिषद, शासन अनुदानित शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली.
शाळेचा पहिला दिवस असल्याने मागील तीन-चार दिवसांपासून पालकमंडळी तयारी करीत होते, सकाळी मुलांना शाळेत पाठविण्याची घाई गडबड प्रत्येक घरोघरी सुरु होती. दोन महिन्याच्या सुटीनंतर बच्चे कंपनीतही उत्साह होता. शाळेत पाऊल टाकताच विद्यार्थी गप्पात रंगले, सुटी कशी घालवली या संदर्भात चर्चा केली. पुढच्या नियोजन संदर्भातही चर्चा केली. शिकवणी कुठे लावणार, शाळांचे तासीका कसे होणार या संदर्भात चर्चा रंगल्या होत्या.

जंक फुडशी कट्टी, भाजी-पोळीशी गट्टी
शाळा सुरु झाली असून पालकांनी शक्यतो मुलांच्या जेवनाच्या डब्यात कडधान्याची भाजी, ऊसळ सोबत २० ते ३० ग्रॅम गुळ, पोळी, सलाद हे द्यावे, घरुन निघताना त्याला जेवनातही हेच पदार्थ द्यावेत. शाळेतून परतल्यानंतर फळे खायला द्यावीत. उघड्यावरचे पदार्थ टाळावेत रात्रीच्या जेवनात हिरव्या भाज्या, पोळी द्यावी. जेणेकरुन मुले कंटाळा करणार नाहीत. मुलांची पचन क्रीयाही योग्य राहिल. पावसाळ्यामुळे अनेक साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. पालकांनी सावध रहावे.

Web Title: Children's twitter started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.