मुलामुलीतील विषमतेची भावना नष्ट व्हावी
By Admin | Updated: March 7, 2017 00:33 IST2017-03-07T00:33:07+5:302017-03-07T00:33:07+5:30
मुलांमुलींबाबत असलेली विषमतेची भावना नष्ट करून समानतेचा दृष्टीकोन समाजात रूजविण्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ संकल्प उत्सव घेण्यात येत आहे.

मुलामुलीतील विषमतेची भावना नष्ट व्हावी
शंकर राठोड : भिलेवाडा येथे बेटी बचाओ संकल्प उत्सव
भंडारा : मुलांमुलींबाबत असलेली विषमतेची भावना नष्ट करून समानतेचा दृष्टीकोन समाजात रूजविण्यासाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ संकल्प उत्सव घेण्यात येत आहे. या उत्सवाच्या माध्यमातून विषमतेची भावना नष्ट व्हावी, असे प्रतिपादन वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांनी केले.
भंडारा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या मीना राजू मंच अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ संकल्प भिलेवाडा येथील ईरा पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्या शहरबानो खान या होत्या. अतिथी म्हणून कार्तिक मेश्राम, शंकर राठोड, सरीता रहांगडाले, ज्योती नाकतोडे, डॉ. बोंदरे, डॉ. सोनाली लांबट, विनिता चकोले, डॉ. चिमणे, एच.बी. सरादे, राम वाडीभस्मे, ओम वाघाये आदी उपस्थित होते.
आठवीच्या विद्यार्थ्यांनीच व त्यांच्या पालकांना या संकल्प उत्सवात आंमंत्रित केले होते. मार्गदर्शक कार्तिक मेश्राम म्हणाले, मुलगा व मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव न ठेवता आईवडिलांनी मुलांप्रमाणेच मुलींना सुद्धा उच्च शिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले पाहिजे.
शाळेच्या मुलींनी नृत्य व पथनाट्य सादर करून मुलींना स्वत:चे रक्षण कसे करावे व मुलींना मुलांप्रमाणे जगण्याचा हक्क मिळावा हे दाखवून दिले. पहेला गांधी विद्यालयात शाळेतील चमूंनी पथनाट्य सादर केले.
मुलगा एकाच घराचे नौवलौकिक करतो तर मुलगी ही माहेर व सासर या दोन्ही घरी नावलौकिक करून सेवा देत असते. डॉ. चिमने यांनी मुलींना स्वत: घ्यावयाची वैयक्तिक काळजी, त्यांची स्वच्छता, स्वत:चे संरक्षण यावर त्यांना माहिती दिली.
डॉ. बोंदरे यांनी मुलींना हात धुण्याच्या पद्धती शिकविल्या. त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबद्दल माहिती दिली. उपप्राचार्य खान यांनी मुलींचे आपल्या जीवनात खुप महत्व आहे व तो अनमोल ठेवा आपण कसा जपून ठेवावा ते सांगितले.
संचालन शिक्षिका पद्मा मोटघरे, शकुन डहारे यांनी केले. यावेळी विद्यार्थीनी, सहभागी शाळेतील शिक्षक, पालक व ईरा पब्लिक शाळेचे शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)