नृत्य, हस्तकला संस्काराने रंगले मुलांचे शिबिर
By Admin | Updated: June 25, 2014 23:36 IST2014-06-25T23:36:48+5:302014-06-25T23:36:48+5:30
अपंग समावेशित सर्वशिक्षा अभियानांतर्गत तालुकास्तरीय विशेष मुलांच्या संस्कार शिबिर घेण्यात आले. यात बालकांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला.

नृत्य, हस्तकला संस्काराने रंगले मुलांचे शिबिर
मानेगाव (बाजार) : अपंग समावेशित सर्वशिक्षा अभियानांतर्गत तालुकास्तरीय विशेष मुलांच्या संस्कार शिबिर घेण्यात आले. यात बालकांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला.
यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) घोडेस्वार म्हणाले, विशेष गरजा धारक अपंग मुले-मुली सुद्धा शिक्षणातील महत्त्वाचा घटक असून त्यांनासुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे. त्यासाठी पालकांनी जागरुकपणे विशेष शिक्षकांचे मार्गदर्शनानुसार पाल्यांवर शिक्षण संस्कार घडवून त्यांची बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक सुप्त कलागुणांद्वारे सर्वांगीण प्रगती घडवावी.
या विशेष गरजाधारक मुलांच्या उन्हाळी संस्कार शिबिरात नृत्य, संगीतकला, हस्तकला फिजीओथेरेपी, वैयक्तिक शिक्षण, म्युझिकल योगा, मानसशास्त्रीय मूल्यांकन व पालकांना समुपदेशन यावर भर देण्यात आला.
विशेष गरजाधारक मुले ही सर्वसामान्य मुलांपासून वेगळी नसून सामान्य मुलांपेक्षा कलागुणांनी किंचितही कमी नाहीत असा आत्मविश्वास वाढविण्यासाठी फिजीओथेरेपीस्ट डॉ. मंजुषा गजभिये, मानसशास्त्रज्ञ विरेंद्र बांते, वंदना गोडघाटे, चंद्रप्रभा वडे, सरादे, सुुचित उईके, सुधीर भोपे, सचिन ठाकरे, शिल्पा वलके, संगीता देशमुख, अंकिता कानतोडे, ज्योत्स्ना बोंबोर्डे, उज्ज्वला खोब्रागडे, सुजाता वाघमारे, वीणा मालेवार, संघमित्रा रामटेके यांनी सहकार्य केले.
समारोपीय कार्यक्रमात अपंग मुलांनी तयार केलेल्या आकर्डक विविध बहुरंगी हस्तकला साहित्याची प्रदर्शनी आकर्षकपणे सजविली होती.
याप्रसंगी वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विनोद चरपे, शिल्पा निखाडे, अपंग जिल्हा समन्वयक विलास गोंदोळे, केंद्रप्रमुख घुघुस्कार, पवार, सविता देशमुख, दीप्ती ठवकर, कारेमोरे, झाडे, ठोसरे, बावणे, अंबादे, गडपाल उपस्थित होते.
प्रास्ताविक विला मालेवार, संचालन वंदना गोडघाटे तर आभारप्रदर्शन नरेंद्र सांदेवार यांनी केले.(वार्ताहर)