सुसंस्कार शिबिरातून घडतात मुले
By Admin | Updated: May 30, 2014 23:28 IST2014-05-30T23:28:16+5:302014-05-30T23:28:16+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रणालीनुसार श्री गुरूदेव सेवा मंडळाचे संक्रिय कार्य घडविण्यासाठी तसेच नव्या पिढीला मानव धर्माचा विश्वशांतीचा व विश्व बंधुत्वाचा दिव्य संदेश देणार्या साधुसंत

सुसंस्कार शिबिरातून घडतात मुले
भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रणालीनुसार श्री गुरूदेव सेवा मंडळाचे संक्रिय कार्य घडविण्यासाठी तसेच नव्या पिढीला मानव धर्माचा विश्वशांतीचा व विश्व बंधुत्वाचा दिव्य संदेश देणार्या साधुसंत व महान पुरूषांच्या कार्य कर्तव्याची जाणीव व्हावी आणि प्रेरणा मिळावी, हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. प्रत्येकच आई वडिल हे मुलांवर संस्कार करतात परंतू त्यांचे सुसंस्काराकडे दुर्लक्ष असल्याचे दैनंदिनीतून दिसून येत असल्याचे मत भंडारा जिल्हा सत्यवादी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश धांडे यांनी केले.
तुमसर तालुक्यातील माडगी देव्हाडा बु. येथे वैनगंगा नदीच्या पात्रातील टेकडीवर असलेले श्री नरसिंह मंदीर देवस्थान असून येथेच पं.पु. अण्णाजी महाराज योचे आश्रम असून या आश्रमाच्या ठिकाणी वंदनिय अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम अंतर्गत भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या मंडळाच्यावतीने १५ दिवसीय बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये तालुक्यातील आजुबाजूच्या परिसरातील जवळपास १0 ते १६ वर्ष वयोगटातील असे ७५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या १५ दिवसवीय आयोजित शिबिरामध्ये सहभागी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक गुरूचार्य यांनी प्रात: स्मरण, सामुदायीक ध्यान, साष्टांग प्रार्थना, ग्रामसफाई, रामधून, श्रमदान, राष्ट्रवंदना, महापुरूषांचे चरित्र दर्शन, स्वालंबन सेवा, शिस्त त्याग, निर्व्यसन, अनिष्ट रूढी उच्चाटन, शेतीविषयक तसेच व्यायाम जसे लाठी काठी, लेझीम, योगासने, सूर्यनमस्कार, ज्युडो कराटे, कवायत, भजन संगीत, भजन, टाळ, खंजरी, तबला, हार्माेनियम, भाषण, प्रवचन, किर्तन, प्रथोपचार ज्यात पासंगिक, प्रथोमपचार माहिती आयुर्वेद व निसर्गाेपचार आणि प्रचार श्री गुरूदेव सेवा मंडळ तत्वज्ञान, ग्रामगिता वाचन, प्रचार आदी विषयांबाबत मार्गदर्शन करून त्यांचेकडून ते अंगिकृत करून घेण्यात आले.
आयोजित १५ दिवसीय शिबिरामध्ये ज्या ज्या मुलांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करीत गुरूवर्याच्या विविध विषयाच्या परीक्षेत पास झालेत अशांना आयोजकांकडून प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ग्रामगिता, प्रमाणपत्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेसह असलेली ट्रॉफी देवून त्यांचे कौतूक करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधले. संचालन मनोहर वडीचार यांनी तर आभार लांजेवार यांनी मानले.
शिबिरासाठी गुरूदेव सेवा मंडळ भंडारा, गोंदिया जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प.पू. अण्णाजी महाराज आश्रम नरसिंह टेकडी माडगी व मानवाधिकार कल्याण समिती जि. भंडाराच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)