ग्रामीण भागातील मुलांनी होळीची परंपरा ठेवली कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:36+5:302021-04-02T04:37:36+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येथील पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करत होळी व धुळ‌वडकडे दुर्लक्ष केले. परंतु येथील ...

Children in rural areas continue the tradition of Holi | ग्रामीण भागातील मुलांनी होळीची परंपरा ठेवली कायम

ग्रामीण भागातील मुलांनी होळीची परंपरा ठेवली कायम

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येथील पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करत होळी व धुळ‌वडकडे दुर्लक्ष केले. परंतु येथील शिक्षक वसाहतमधील पराग दहीकर, समीर खुणे, वंश काडगाये, भारत बोरकर, मोक्ष बांते, दददू मडावी, पूर्वा दहीकर, श्रीया ढोमणे, इच्छा काडगाये या लहान मुलांनी शिक्षक वसाहतमध्ये पडलेला कचरा व पालापाचोळा एकत्र करुन पर्यावरणपूरक होळीचे दहन केले. मागील ३० वर्षापासून येथे सामूहिकरीत्या होळी साजरी करण्याची परंपरा आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे मोठ्यांनी दुर्लक्ष केले. परंतु लहान मुलांनी ती परंपरा कयम ठेवली. त्यांच्या या सलोख्याचे क्षेत्र सहायक नान्हे, चरण चेटले, वनरक्षक भंडारी, चेतन दहीकर, प्राचार्य नरेंद्र काडगाये, गुणेश काडगाये यांनी कौतुक केले.

बॉक्स

गौरनगर येथे साजरी केली पर्यावरणपूरक होळी

अर्जुनी मोरगाव : जयदुर्गा हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, गौरनगर येथे सामाजिक जागृतीचे भान ठेवून पर्यावरणपूरक होळी दहन कार्यक्रम घेण्यात आला. यातून स्वछतेचा संदेशही देण्यात आला. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेत फिजिकल डिस्टन्सिंगचे भान ठेवून ग्रामपंचायत परिसर, मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. शालेय पटांगणात कचऱ्याचे दहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांसह ग्रामपंचायत सदस्य, सरपंच वंदना अधिकारी, मुख्याध्यापक सुनीलकुमार पाऊलझगडे उपस्थित होते.

Web Title: Children in rural areas continue the tradition of Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.