रानडुकराच्या हल्ल्यात बालक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:36 IST2021-04-22T04:36:22+5:302021-04-22T04:36:22+5:30

गौरव हरिश्चंद्र हेरवार (१६) असे जखमी बालकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी तो घरची पाळीव जनावरे चारण्यासाठी कुडेगाव शेतशिवारात ...

Child seriously injured in bull attack | रानडुकराच्या हल्ल्यात बालक गंभीर

रानडुकराच्या हल्ल्यात बालक गंभीर

गौरव हरिश्चंद्र हेरवार (१६) असे जखमी बालकाचे नाव आहे. बुधवारी सकाळी तो घरची पाळीव जनावरे चारण्यासाठी कुडेगाव शेतशिवारात मित्रांसोबत गेला होता. जनावरांना चारावयास सोडून शेतशिवारात बसला होता. त्यावेळी अचानक एका रानडुकराने त्याच्यावर हल्ला केला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने रानडुक्कर पळून गेले. मात्र तोपर्यंत गौरव गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारार्थ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित दिली. त्यांनी जखमीची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. गौरवची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गत काही दिवसापासून तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. गत आठवड्यात एका अस्वलाने तीन शेतकऱ्यांना जखमी केले होते.

Web Title: Child seriously injured in bull attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.