शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीला जमिनीवर आपटले

By admin | Updated: November 1, 2014 22:46 IST

पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचे गवंडी कामावर असलेल्या पुरुषाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे त्यांच्यात शारीरिक संबंध आले.

सिरसघाट येथील घटना : आरोपीला अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडीभंडारा : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचे गवंडी कामावर असलेल्या पुरुषाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे त्यांच्यात शारीरिक संबंध आले. यातच त्या महिलेला दिवस गेले. त्यानंतर तिला गर्भपात करण्याचा अट्टाहास धरला. परंतु, काही ऐकले नाही. महिनाभरापूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्या पुरुषाने त्या चिमुकलीला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. ही घटना सिरसघाट येथे घडली असून याप्रकरणी आरोपी शेखर सहादेव तरारे (३५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. भंडारा तालुक्यातील सिरसघाट येथील ३४ वर्षीय पीडित महिला ही पूर्वी होमगार्ड सेवेमध्ये कार्यरत होती. सध्या ती गवंडी कामावर मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविते. सदर महिला पतीपासून विभक्त असून तिला १२ वर्षाचा मुलगा आहे. विभक्त झाल्यापासून ती सिरसघाट येथे माहेरी राहत आहे. आमगाव (दिघोरी) येथील शेखर तरारे हा गवंडी काम करतो. कामादरम्यान दोघांची नोव्हेंबर २०१३ मध्ये गांधी चौकात ओळख झाली. त्यानंतर एकाच कामावर राहत असल्यामुळे त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. कालांतराने प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दरम्यान त्याने लग्न करणार असल्याचे आमिष देत शेखरकडून पीडित महिलेला गर्भधारणा झाली. ही बाब तिने मे महिन्यात शेखरला सांगितली. त्यानंतर त्याने गर्भपात करण्याचा सल्ला दिला. मात्र पीडिता ही पतीपासून विभक्त राहत असल्यामुळे व दोघेही एकाच समाजाचे असल्याने प्रसूती झाल्यानंतर तो तिला स्वीकारेल, असे तिला वाटत असल्यामुळे तिने गर्भपाताला विरोध केला. या दरम्यान शेखरने महिलेला गर्भपातासाठी २० हजार रुपये दिले होते. मात्र पीडितेने गर्भ आडवे असल्यामुळे गर्भपात होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे कारण शेखरला सांगितले. दरम्यान, या महिलेने शुक्रवारला प्रसूती झाल्याचे शेखरला सांगितले. प्रसूतीसाठी आलेला खर्च देण्यासाठी तिने फोन केला होता. आता समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी शेखरने पीडितेचे घर गाठले. यावेळी पीडिता घरातील दरवाजात मुलीला घेऊन बसली होती. शेखरच्या डोक्यात संताप संचारला असताना त्याने बहाणा करून तिला पिण्याचे पाणी मागितले. त्यानंतर ती मुलीला त्याच्याजवळ सोपवून घरात पाणी आणण्यासाठी गेली. ही संधी साधून शेखरने २१ दिवसाच्या बाळाला संतापाच्या भरात ठार करण्याच्या उद्देशाने जमिनीवर आपटले. त्यानंतर बाळाने किंकाळी फोडल्याने ती धावून आली व पुढील अनर्थ टळला. यात नवजात बाळ गंभीररीत्या जखमी झाला आहे. याप्रकरणी कारधा पोलिसात पीडित महिलेने तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी शेखरविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या घटनेचा तपास ठाणेदार राजेंद्र शेट्टे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)