शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री सपशेल खोटे बोलतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:59 IST

तुमसर विधानसभा मतदार संघात विकास शुन्य असून शासकीय योजनेंतर्गत पेटी वाटपात अनियमितता आहे. मतदार संघात सिंचनाचा प्रश्न कायम असून कारखाना बंद असल्याने बेरोजगारी वाढली आहे. सत्ताधारी केवळ पोकट आश्वासने देत असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देतुमसर येथे महापर्दाफाश यात्रेचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विकास कामे न करता केवळ बेताल वक्तव्य करण्याचा एकच उद्योग भाजप सरकारचे मंत्री व नेते करीत आहेत. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत सपशेल खोटे बोलत असून त्यांचा महापर्दाफाश करण्यासाठी काँग्रेसने यात्रा काढली आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी येथे केले.तुमसर येथील मातोश्री सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश महासचिव जिया पटेल, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, अरविंद कारेमोरे, माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे, नारायण कारेमोरे, श्याम भांडे, डॉ. पंकज कारेमोरे, रमेश पारधी, प्रमोद तितीरमारे, कुंदा वैद्य, के.के. पंचबुद्धे, मोहाडी नगरपरिषद उपाध्यक्ष सुनील गिºहेपुंजे, मोहाडीच्या नगराध्यक्ष गीता बोकडे, प्रभू मोहतुरे, गौरीशंकर मोटघरे उपस्थित होते.यावेळी बोलताना, प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. पंकज कारेमोरे म्हणाले, तुमसर विधानसभा मतदार संघात विकास शुन्य असून शासकीय योजनेंतर्गत पेटी वाटपात अनियमितता आहे. मतदार संघात सिंचनाचा प्रश्न कायम असून कारखाना बंद असल्याने बेरोजगारी वाढली आहे. सत्ताधारी केवळ पोकट आश्वासने देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तुमसरचे माजी नगराध्यक्ष जगदिशचंद्र कारेमोरे, जलद शर्मा, शंकर बडवाईक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. संचालन राजेश ठाकूर व सुरेश मेश्राम यांनी तर आभार शंकर राऊत यांनी मानले. यावेळी अ‍ॅड. विजय इलमे, विजय गिरिपुंजे, कमलाकर निखाडे, शुभम गभणे, चंदू तुरकर, बालकदास ठवकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले