महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री सपशेल खोटे बोलतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:59 IST2019-08-28T23:58:33+5:302019-08-28T23:59:24+5:30

तुमसर विधानसभा मतदार संघात विकास शुन्य असून शासकीय योजनेंतर्गत पेटी वाटपात अनियमितता आहे. मतदार संघात सिंचनाचा प्रश्न कायम असून कारखाना बंद असल्याने बेरोजगारी वाढली आहे. सत्ताधारी केवळ पोकट आश्वासने देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Chief Minister Sapasheel lied on the Mahajanesh Yatra | महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री सपशेल खोटे बोलतात

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री सपशेल खोटे बोलतात

ठळक मुद्देतुमसर येथे महापर्दाफाश यात्रेचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : विकास कामे न करता केवळ बेताल वक्तव्य करण्याचा एकच उद्योग भाजप सरकारचे मंत्री व नेते करीत आहेत. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत सपशेल खोटे बोलत असून त्यांचा महापर्दाफाश करण्यासाठी काँग्रेसने यात्रा काढली आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी येथे केले.
तुमसर येथील मातोश्री सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश महासचिव जिया पटेल, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, अरविंद कारेमोरे, माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे, नारायण कारेमोरे, श्याम भांडे, डॉ. पंकज कारेमोरे, रमेश पारधी, प्रमोद तितीरमारे, कुंदा वैद्य, के.के. पंचबुद्धे, मोहाडी नगरपरिषद उपाध्यक्ष सुनील गिºहेपुंजे, मोहाडीच्या नगराध्यक्ष गीता बोकडे, प्रभू मोहतुरे, गौरीशंकर मोटघरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना, प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. पंकज कारेमोरे म्हणाले, तुमसर विधानसभा मतदार संघात विकास शुन्य असून शासकीय योजनेंतर्गत पेटी वाटपात अनियमितता आहे. मतदार संघात सिंचनाचा प्रश्न कायम असून कारखाना बंद असल्याने बेरोजगारी वाढली आहे. सत्ताधारी केवळ पोकट आश्वासने देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तुमसरचे माजी नगराध्यक्ष जगदिशचंद्र कारेमोरे, जलद शर्मा, शंकर बडवाईक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. संचालन राजेश ठाकूर व सुरेश मेश्राम यांनी तर आभार शंकर राऊत यांनी मानले. यावेळी अ‍ॅड. विजय इलमे, विजय गिरिपुंजे, कमलाकर निखाडे, शुभम गभणे, चंदू तुरकर, बालकदास ठवकर आदी उपस्थित होते.

Web Title: Chief Minister Sapasheel lied on the Mahajanesh Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.