चिचाळ येथे ४५ वर्षांपासून आखाड्याची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:25 IST2018-09-11T22:23:55+5:302018-09-11T22:25:36+5:30
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरतपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित या आखाड्यात जिल्हा व परजिल्ह्यातील ४० मल्लांनी सहभाग नोंदविला. अॅड.देवीदास वैरागडे यांनी ही आखाड्याची परंपरा कायम राखली आहे.

चिचाळ येथे ४५ वर्षांपासून आखाड्याची परंपरा कायम
प्रकाश हातेल।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरतपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित या आखाड्यात जिल्हा व परजिल्ह्यातील ४० मल्लांनी सहभाग नोंदविला. अॅड.देवीदास वैरागडे यांनी ही आखाड्याची परंपरा कायम राखली आहे.
जिल्ह्यातील विविध शारीरिक खेळोत्तेजक मंडळ व शारीरिक खेळ लोप पावत चालले आहेत. विज्ञानाने जरी मानवाची प्रगती केली असली तरी शैक्षणिक क्षेत्रात शारीरिक शिक्षणाचे अभाव जाणवत आहे. प्रत्येक गाव खेड्यात रात्रीला एक तास चालणारे आखाडे बंद पडले आहेत. मात्र चिचाळ येथील अॅड.देवीदास वैरागडे यांनी स्वखर्चाने ही परंपरा जोपासत असल्याने ही आखाड्याची ४५ वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.
सालाबादाप्रमाणे या वर्षाला पवनी तालुक्यातील अहिल्यादेवी होळकर बाजार चौक चिचाळ येथे आखाड्याचे आयोजन अॅड.देवीदास वैरागडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. उपस्थित जयराम दिघोरे, मनोज वैरागडे, दिवारू वाघधरे, मुखरु वैद्ये, रामकृष्ण वैरागडे, देवराम वाघधरे, श्रीकृष्ण काटेखाये, शंकर मांडवकार, दिनेश नंदपुरे, मुनीर शेख, मोहन हरडे, जगतराम गभणे, ईश्वर काटेखाये, महादेव उके, माणिक वैरागडे आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम बजरंगबली यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या आखाड्यात पंचक्रोशितील व परजिल्ह्यातील ४० मल्ल्यांच्या कुस्तीचे प्रदर्शन दाखविण्यात आले. यामध्ये प्रवीण वासनिक, मोहित काटेखाये, तुळशीराम कुंभळे, तृणाल जिभकाटे, अरविंद ठाकरे, कार्तीक चाचेरे, सागर डोकरीमारे, वैभव बिलवणे, रोशन मेश्राम, विशाल बिलवणे, मंगेश अहिर, उमेश वाघधरे, केशव लेदे, विनायक बनकर, अमोल तितीरमारे, अश्विन बिलवणे, दिनेश अहिर, कैलाश फुंडे, भावेश ठवकर आदी मल्लांनी हजेरी लावली होती. विजयी मल्लांना स्मृतीचिन्ह, बनियान, टावेल व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. पराभूत मल्लांनाही बनियान टॉवेल देण्यात आले. पंच म्हणून जयराम दिघोरे, देवराम वाघधरे, ईश्वर वैद्य यांनी सांभाळले. कार्यक्रमाचे संचालन आदर्श शिक्षक मुख्याध्यापक यशवंत लोहकर व आभार परसराम दिघोरे यांनी केले.