छत्रपतींचे कार्य समाज उन्नतीच्या क्रांतीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST2021-02-23T04:53:25+5:302021-02-23T04:53:25+5:30
तुलसी बहूद्देशीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय जवाहरनगर पेट्रोलपंप येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने शिवजयंती प्रसंगी प्रमुख ...

छत्रपतींचे कार्य समाज उन्नतीच्या क्रांतीचे
तुलसी बहूद्देशीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय जवाहरनगर पेट्रोलपंप येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने शिवजयंती प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आर. टी. पटले हे होते.
यावेळी प्रा. डॉ. सी. वी. साखरवाडे, राष्ट्रीय योजना शिबिर प्रमुख डॉ. आर. एन. मानकर, अधीक्षक ललीत ठाकूर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात आर. टी. पटले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू साम्राज्याचे प्रखर राष्ट्रभक्त होते. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेचे राज्य स्थापन केले. बहुजनांच्या हक्कासाठी झटले. त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहे. संचालन रासेयो अधिकारी डॉ. आर. एन. मानकर यांनी केले. आभार सी. पी. साखरवाडे यांनी मानले. यशस्वितेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.