कोंढा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:36 IST2021-04-02T04:36:39+5:302021-04-02T04:36:39+5:30
कोंढा -कोसरा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार ३९२ व्या जयंती उत्सव राजमुद्रा सामाजिक व क्रीडा ...

कोंढा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती
कोंढा -कोसरा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार ३९२ व्या जयंती उत्सव राजमुद्रा सामाजिक व क्रीडा मंडळ कोंढा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कोविड १९ नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी बोलताना मंडळाचे अध्यक्ष विलास गिरडकर यांनी शिवाजी महाराज हे जगातील सर्व मानवतावादी चळवळीचे सर्वोच्च आदर्श विश्वातील सर्वश्रेष्ठ लोककल्याणकारी, लोकहितकारी, लोकाभिमुख प्रशासन करणारे, शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य रयतेचे स्वराज्यनिर्माते, महान योद्धे, विश्वाला वंदनीय, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक असल्याचे विचार असल्याचे सांगितले. जयंतीच्या तिथीनुसार कृष्ण तृतीयानुसार आज आसनारूढ मूर्तीचे पूजन करून माल्यार्पण आणि आरती करण्यात आली.
यावेळी कोविड १९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून मोजक्या लोकांमध्ये साध्या स्वरूपात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रुपचे लोपचंद जिभकाटे, सारंगधर मोहरकर, युगल सेलोकर, स्वप्नील जिभकाटे, शुभम मोहरकर, विष्णू जुमळे, गणेश मोहरकर, अनुप विश्वास, तुषार जिभकाटे, पिंटू जांभुळे, समय गिरडकर, सुमित कावळे, श्रयेश गिरडकर, केशराज मोहरकर आणि राजमुद्रा ग्रुपचे सभासद उपस्थित होते.