विनाेद हंसराज रावल रा. पहेला यांचे किराणा दुकान आहे. गावातच किराणा साहित्याचे गाेदामही आहे. संचारबंदीच्या काळात नियमांचे पालन करून किराणा साहित्याची विक्री केली जाते. बुधवारी रात्री त्यांनी गाेदामात साहित्य ठेवून गाेदाम कुलूपबंद केले. दुसऱ्या दिवशी पहाटे पाहतात तर काय चाेरट्याने दाराचे कुलूप ताेडलेले दिसून आले. आत प्रवेश करून बघितले तर चाेरट्याने किराणा साहित्य लंपास केल्याचे दिसून आले. चाेररट्याने जेमिनी सनफ्लाॅवर पाच लीटरचे दाेन बाॅक्स किंमत ६४०० रुपये, फल्ली तेल पाच लीटरचे दोन बाॅक्स किंमत ६८००, जेमिनी साेयाबीन तेल १५ लीटरचे दाेन डब्बे किंमत ९२०० रुपये, सनफ्लाॅवर तेलाचे तीन डब्बे, जेमिनी फल्ली तेलाचे एक लीटरच्या पाऊंचचे दाेन बाॅक्स किंमत ४३००, जेमिनी साेयाबीन तेलाचे एक लीटरचे दाेन बाॅक्स किंमत ३५०० रुपये, मँगाे लाेणचे १०० ग्रॅमच्या बरण्या किंमत १८०० रुपये, दिघाेरी मिरची ५०० ग्रॅमचे १६ पाकीट, आलं-लसूनची ४८ पाकीट, सरगम साबनाचा एक बाॅक्स, चिली साॅस तीन बाॅक्स, पतंजली शाम्पू व पेस्ट एक बाॅक्स, पतंजली हेअर तेल एक बाॅक्स आणि माचिस पेटीचे तीन बाॅक्स असे साहित्य चाेरून नेले. या प्रकरणी अड्याळ पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.
गाेदामातून चाेरले तेल, लाेणचे, मिरची पावडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST